VIDEO रस्त्याने चालणाऱ्या माणसाच्या पायाला सापाने घातला वेटोळा! - snake wrapped in man leg
हैदराबाद - सापाने माणसाच्या पायाला गुंडाळल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ही घटना करिमनगर जिल्ह्यातील जगंपल्ली गावातील आहे. गड्डामीडी राजैयाह हे वाटेने जात असताना वाटेत आलेल्या सापाने त्यांच्या पायाला वेटोळा घातला. काही वेळातच सापाने त्यांच्या शरीराला आणखी वेटोळा घालण्यास सुरुवात केली. त्यांनी सापाचे मस्तक पकडले. त्यांची ही अवघडलेली स्थिती पाहून अनेकजण घाबरत होते. दुसऱ्याच्या मदतीने त्यांनी सापापासून सुटका केली. त्यांनी सापाचे मस्तक पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी साप जमिनीवर पडला. तेव्हा त्यांनी काठीने सापाला मारले. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.