आवाजांचा जादूगार : पुरुष आणि महिलेच्याही आवाजात गाणारे 'करुणाकर' - महिला आणि पुरुषाच्या आवाजात गाणारे गायक
प्रत्येक गायकाचा आवाज वेगळा असतो आणि त्याच्या स्वरातील चढ-उतारदेखील वेगळे असतात. मात्र, एक असे गायकही आहेत, जे पुरुष आणि महिला अशा दोन्ही आवाजात अगदी सहजपणे गाऊ शकतात. करुणाकर हे मंगळुरू शहरातील प्रसिद्ध गायकांपैकी एक आहेत. ते कोणतेही गीत पुरुष आणि महिला दोन्हीच्या आवाजात गाऊ शकतात. करुणाकर यांचे दोन्ही आवाजात गाण्याचे कौशल्य अद्वितीय आहे. ते महिलेच्या आवाजातही इतक्या सफाईदारपणे गातात की श्रोत्यांना गाणारी व्यक्ती पुरुष आहे हे समजल्यावर आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही. पाहा हा व्हिडिओ..