1.8 कोटी रुपयांची सोन्याची तलवार हैदराबादच्या भाविकाकडून तिरुपती देवस्थानला दान - M S prasad
अमरावती (आंध्र प्रदेश) - जगातील सर्वात श्रीमंत देवस्थान मानले जाणाऱ्या तिरुपती देवस्थान (टीटीडी) हे भाविकांकडून मिळणाऱ्या दानामुळे नेहमीच चर्चेत असते. हैदराबादमधील एम. एम. प्रसाद यांनी 1.8 कोटी रुपयांची सोन्याची तलवार तिरुपतीला दान केली आहे. ते व्हीआयपी दर्शनमार्ग सोमवारी सकाळी मंदिरात पोहोचले. यावेळी त्यांनी सोन्याची तलवार तिरुपतीला अर्पण केली. त्यांनी दान हे तिरुपती देवस्थानच्या अधिकाऱ्याकडे (टीटीडी) हस्तांतरित केले आहे.