भारतीय संगीतातील प्रसिद्ध तंतुवाद्य 'तंजावर वीणा', जाणून घ्या माहिती - तंजावरची सरस्वती वीणा बातमी
तंजावर (तामिळनाडू) - भारतीय संगीतातील एक प्राचीन व प्रमुख तंतुवाद्य. प्राचीन काळी वीणा हे नाव साधारणतः अवनध्द वाद्ये आणि घनवाद्ये वगळता, इतर प्रकारांना उद्देशून वापरले जात असावे. अलीकडे मात्र वीणा ही संज्ञा सामान्यतः दांड्यावर स्वरांचे पडदे असलेल्या तंतुवाद्याला अनुलक्षून वापरली जाते. वीणेचा विकास दक्षिण भारतात झाला. तंजावर (तंजोर) येथे कर्नाटक पद्धतीच्या शास्त्रीय संगीताचा उदय झाला. तंजावर वीणा बनवणारे कलाकार आपल्या कलात्मकतेची अद्भूत शैली आणि किरकोळ गोष्टींवर विशेष लक्ष देतात. तीन भागात तयार होणाऱ्या विणेला हातांनी विशेष आकार देऊन बनवले जाते. यातील पहिला भाग म्हणजे पॉट ज्यात लाकडाच्या तुकड्याला आकार दिला जातो. दुसरा भाग म्हणजे धांडणी किंवा नळी आणि तिसरा भाग म्हणजे याझी चेहरा असतो. या भव्य आणि नक्षीदार कोरीव कामाच जीवंत स्वरुप ५२ इंच लांब आणि ८ किलो वजनी वीणेच्या रुपात आपल्याला पाहायला मिळते.