LIVE VIDEO: शिमल्यात सात मजली इमारत कोसळतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद - इमारत कोसळतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद
शिमला - राजधानी शिमलाच्या कच्ची घाटीमध्ये एक बहुमजली इमारत कोसळली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु इतर इमारतींना धोका निर्माण झाला आहे. इमारतीत गुरुवारी सकाळीच भेगा पडल्या होत्या, त्यानंतर इमारत रिकामी करण्यात आली आणि काही तासांनंतर इमारत कोसळली. इमारतीचे भंगार काही घरांवरही आदळले आहे. अजूनही इमारतीभोवती भूस्खलन होत आहे, अर्ध्या डझन इमारतींना धोका निर्माण झाला आहे. कच्ची घाटीतील बहुतांश इमारती डोंगरांवर बांधलेल्या आहेत. येथील जमीन बराच काळ पाण्याखाली होती. इमारत रिकामी करण्यात आली, पण लोकांना त्यांचे सामान बाहेर काढता आले नाही. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.