गुजरातमध्ये महामार्गावर मुक्तसंचार करताना दिसले ५ सिंह, व्हिडिओ व्हायरल - गुजरात
अमरेली (गुजरात) - गुजरात राज्यातील अमरेली जिह्याच्या राजुला महामार्गावर काल सोमवारी रात्री ५ सिंहाचा कळप फिरताना दिसला. रात्री ११ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास पीपवाव पोर्ट रस्त्यावर ३ मादा सिंह दोन बछड्यांसह मुक्तपणे संचार करीत होते. सिंहाचा कळप पाहून स्थानिक नागरिक जमा झाले आणि ते त्या सिंहाच्या कळपाचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत करू लागले. यातील एकाने या सिंहाच्या कळपाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.