अजमेरमध्ये भीक मागणाऱ्या मुस्लिम कुटुंबाला मारहाण; व्हिडिओ व्हायरल - BEGGARS BEATEN
अजमेर - रामगंज भागात भीक मागणाऱ्या मुस्लिम कुटुंबाला मारहाण झाल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहे. पाकिस्तानला जा, तिथे भीक मिळेल, असे आरोपी मारहाण करत असताना म्हणत असल्याचा ऐकायला मिळत आहे. हा व्हिडिओ 20 ऑगस्टचा असल्याची माहिती आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. आरोपी ललित शर्मा चंद्रवरदाई नगरमधील रहिवासी आहे. तर पीडित माशूक अली उत्तर प्रदेशच्या कानपुर येथील रहिवासी आहे.
Last Updated : Aug 25, 2021, 1:18 PM IST