हॉकीचे १४ ऑलिंपिक खेळाडू घडवणारे पंजाबमधील संसापूर गाव - पंजाबच्या जालंधरमधील संसापूर गाव
चंदीगड - पंजाबच्या जालंधरमधील संसापूर गाव हॉकीच्या मक्का रुपात ओळखलं जातं. या गावाला गौरवशाली इतिहास लाभलाय. जो व्यक्ती या गावाचा इतिहास ऐकतो त्याला या गावाबद्दल नक्कीच गर्व वाटायला लागतो. कारण संसापूर हे एक असं गाव आहे ज्या गावानं आत्तापर्यंत १४ ऑलिंपिक खेळाडू दिले आहेत. या खेळाडूंनी मोठ-मोठ्या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत २७ पदकं जिंकलीयेत.