'लॉकडाऊन'मध्ये अडकलेल्या 125 पाकिस्तानी नागरिकांची मायदेशी रवानगी - COVID-19 pandemic
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाल्यापासून भारतात अनेक पाकिस्तानी नागरिक अडकले होते. भारतात अडकलेल्या पाकिस्तानी व्यक्ती तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आज अटारीच्या वाघा सीमारेषेवरून माघारी सोडण्यात आले. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार 125 पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी सोडण्यात पाठवण्यात आले आहे. युएनओ चीफ मेजर जोसेफ देखील उभय देशांतील संबंधांवर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत सहा जणांचे शिष्टमंडळ जाणार आहे.