VIDEO: १०३ वर्षाच्या चिरतरुण अॅथलिट मान कौर यांना मिळाला 'नारी शक्ती पुरस्कार' - मान कौर पंजाब
चंदिगड- पंजाबमधील मान कौर या महिलेने वयाची शंभरी पार केली आहे. १०३ व्या वर्षाच्या त्या उमदा अॅथलिट आहेत. कौर यांना या वर्षीचा नारी शक्ती पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय. कौर यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी आपल्या अॅथलिट कारकिर्दिला सुरूवात केली. पुरस्कार घेण्यासाठी मंचावर येताना त्यांच्यातील उत्साह तरुणांनाही लाजवणार होता. पुरस्कार मिळाल्यानंतर त्या धावतच मंचावरून खाली गेल्या.