महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : कोयना जलाशयात धुक्याची दुलई; पाहा, डोळ्यांचे पारणे फेडणारे सुंदर दृश्य - कोयना धरण जलाशय धुक्याची दुलई

By

Published : Feb 12, 2022, 3:58 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST

कराड (सातारा) - कोयना खोरे सध्या धुक्यात हरवले असून कोयना धरणाच्या ( Koyna Dam ) अथांग शिवसागर जलाशयावर धुक्याची दुलई पहायला ( fog on koyana dam reservoir ) मिळत आहे. गुलाबी थंडी आणि धुक्यामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये जणू हिमालय अवतरल्याचा भास होत आहे. ( Himalaya in Sahyadri mountain range ) कोयना खोर्‍यावरील धुक्याची दुलई डोळ्याचे पारणे फेडत आहे. कोयना धरणाचा शिवसागर जलाशय बामणोली, तापोळ्यापर्यंत पसरलेला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, घनदाट कोयना अभयारण्य आणि निसर्गाची मुक्त उधळण कोयना खोर्‍यात पहायला मिळते. धुक्याच्या दाट दुलईत हरविलेल्या महाराष्ट्राच्या मिनी काश्मिरचा परिसर पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडत आहे. याचबरोबर कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात एका तिरावरून दुसर्‍या तिराकडे पोहत जाणारे सांबर पर्यटकांच्या कॅमेर्‍यात कैद झाले आहे. ( Sambar deer in Koyna Dam ) वन्य प्राण्याकडून शिकार होण्याचा धोका संभवत असल्यास सांबर जीव वाचवण्यासाठी पाण्याचा आसरा घेते. पाण्यात जास्त काळ ते राहू शकते. तसेच ते पाण्यात वेगाने पोहू शकते. अशाच एका सांबराचे कोयनेच्या जलाशयात पोहतानाचे चित्रिकरण पर्यटकांनी केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details