VIDEO : शेतकऱ्याला जास्त भाव दिल्याने व्यापाऱ्यांची व्यापाऱ्याला मारहाण - अधिक भाव दिल्याने व्यापाऱ्यांची व्यापाराला मारहाण
औरंगाबाद - शेत मालाला जास्त भाव दिल्याने कन्नडमधील करंजखेडा बाजार समितीत व्यापाऱ्याने व्यापाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. साहिल चुडीवाल असे मारहाण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. कृषी उत्पन्न बजार समितीत आपला माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या मालाला जास्त भाव दिल्याने इतर व्यापारी संतप्त झाले. ते जाब विचारण्यासाठी चुडीवाल यांच्याकडे गेले. त्यातून इतर व्यापाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप साहिल चुडीवाल यांनी केला आहे. हर्षवर्धन निकम आणि दत्तू गवारे अशी मारहाण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST