Babanrao Lonikar on Wine Decision : 'वाईन ही दारु नाही तर येणाऱ्या अधिवेशनात चहा पाण्याऐवजी वाईन द्यावी' - भाजप आमदार बननराव लोणीकर परतूर
जालना - आघाडी सरकारमधील रोज एक मंत्री वाईन ही दारु नाही असे वक्तव्य करीत आहे असे असेल तर येणाऱ्या अधिवेशनात या सरकारकारने सर्वाना चहा पाण्याऐवजी वाईनच ( MLA Babanrao Lonikar on Wine Decision ) द्यावी. या सरकारला जनाची नाही तर मनाची लाज असेल तर त्यांनी हा दुर्दैवी निर्णय मागे घ्यावा. अन्यथा विधान सभेचे अधिवेशन चालु देणार नाही. अशा इशारा त्यांनी दिला आहे. तर ते म्हणाले की, सध्या द्राक्षाच्या मालाला भाव नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या द्राक्षाला प्रति क्विंटल 10 हजार रु भाव द्यावा आणि शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा. असे आमदार बननराव लोणीकर यांनी म्हटले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST