महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Silver Oak Attack : शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेला हल्ला निंदनीय : आमदार आशुतोष काळे - आमदार आशुतोष काळे

By

Published : Apr 9, 2022, 7:33 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

शिर्डी ( अहमदनगर ) : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( NCP Leader Sharad Pawar ) यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेली दगडफेक हे ( Silver Oak Attack ) निंदनीय कृत्य असून, या घटनेचा निषेध करत असल्याचे कोपरगाव विधानसभेचे आमदार आशुतोष काळे ( MLA Ashutosh Kale ) यांनी सांगितले. कोपरगावात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या भ्याड हल्ल्याचा गांधी चौक याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निषेध करण्यात ( Kopargaon Protest Against Silver Oak Attack ) आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संदीप वर्पे, तालुकाध्यक्ष माधावराव खिल्लारी, शहराध्यक्ष सुनील गंगुले, नवाज कुरेशी, विरेन बोरावके, मेहमूद सय्यद, बाळासाहेब रुईकर, धरम बागरेचा, गोरख जामदार, मुकुंद इंगळे, दिनेश संत, राजेंद्र वाघचौरे आदीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details