नूतन वर्षानिमित्त आळंदी सजली; आजपासून माऊलींच्या संजीवन समाधीचे स्पर्श दर्शन सुरू
पिंपरी-चिंचवड - गुढी पाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या मुहूर्तावर देवाची आळंदी सजली ( Alandi decorated for New Year ) आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराला रंगीबेरंगी फुलांची सजावट करत रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या. दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे ज्ञानोबा माऊलींच्या संजीवन समाधीचे स्पर्श दर्शन घेता येत नव्हते. आजपासून भाविकांना स्पर्श दर्शन घेता येणार ( Sanjeevan Samadhi Darshan starts ) आहे. दरम्यान, पाडव्याच्या मुहूर्तावर भाविकांनी आळंदीत गर्दी केलीय. देवाच्या आळंदीत गुढी पाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या निमित्ताने मंदिर रंगीबेरंगी फुलांनी सजले आहे. भाविकांना ही सजावट आकर्षित करत आहे. गेल्या दोन वर्षांपासून श्री ज्ञानोबांच्या संजीवन समाधीचे स्पर्श दर्शन घेता येत नव्हते. कोरोना संकट आटोक्यात आल्याने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाविकांना संजीवन समाधीचे स्पर्श दर्शन घेता येणार ( Dnyaneshwar Maharaj Sanjeevan Samadhi Darshan starts ) आहे. स्पर्श दर्शन घेण्यासाठी भाविकांची मुख्य मंदिरात गर्दी झाली आहे. संस्थान घेतलेल्या या निर्णयाचे भाविक आणि वारकऱ्यांन समाधान व्यक्त केले आहे. गुढी पाडवा असल्याने आज सकाळ पासूनच आळंदीत भाविकांनी गर्दी केल्याच पाहायला मिळाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST