NCP Agitation In Pune : पुण्यातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन - agitation of ncp women congress
पुणे - शिवाजीनगर येथे नामंकित शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने शिवाजी नगर पोलीस चौकीसमोर याविरोधात आंदोलन करण्यात ( NCP Agitation In Pune ) आले. त्या नराधम आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी व मुलींच्या सुरक्षेत दिरंगाई करणाऱ्या संस्थाचालक व प्राचार्य यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी करत निषेध नोंदवण्यात आला. गेल्या काही दिवसांत अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत असून, एका शाळेमध्ये घडलेला प्रकार खरोखर दुर्दैवी आहे. भरमसाठ फी घेऊन जर आमच्या लेकी - बाळी शाळेमध्ये सुरक्षित नसतील, तर मुलींना शिक्षणासाठी पाठवायचे कुठे..?, असा सवालही राष्ट्रवादीच्या वतीने विचारण्यात आला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST