''युध्दात कोणाचाही विजय होत नाही, होतो फक्त पराभव'' - सुनिल शेट्टी - युध्दात कोणाचाही विजय होत नाही
मुंबई - युक्रेन प्रश्नाबाबत तुमचे मत काय असे पत्रकारांनी विचारले असता सुनिल म्हणाला, ''खूपच दुःखद गोष्ट आहे ही. कारण युध्दात कोणाचाही विजय होत नाही, फक्त पराभवच होतो...लोकांचाही पराभव होतो. खूपच वाईट वाटते.'' युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी अडकले आहेत असे विचारले असता सुनिल म्हणाला की, ''पण बरेचसे विद्यार्थी परतदेखील आले आहेत. ही खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि सरकारला आणि मदत करणाऱ्या सर्वांना माझा सलाम. तिथं अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणि कुटुंबांना परत आणण्याचा सतत प्रयत्न सुरू आहे. हीच प्रार्थना करेन की सर्वजण सुखरुप परत यावेत.''
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST