महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

पेपर फुटीप्रकरणी मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर अभाविपचे आंदोलन, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात - अभाविपचे आंदोलन

By

Published : Mar 16, 2022, 3:09 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

मुंबई - सध्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. मात्र, या परीक्षांमध्ये कुठे शिक्षकांनीच कॉप्या पुरवणे तर कधी एखाद्या विषयाच्या पेपरच फुटणे, असे प्रकार वारंवार घडत आहेत. या वाढत्या पेपरफुटीप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ( ABVP Activist Agitation ) शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( Education Minister Varsha Gaikwad ) यांच्या धारावीतील निवासस्थानासमोर आंदोलन केले. यावेळी त्यांनी वर्ष गायकवाड यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. आंदोलनाची माहिती मिळताच धारावी पोलिसांनी घटनास्थळी घाव घेत, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने आंदोलकांना ताब्यात घेतले. सर्व आंदोलनकांना धारावी पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details