VIDEO: केळीच्या पानावर लतादीदींचे चित्र रेखाटत अनोखी श्रद्धांजली - लता दीदी चित्र केळी पान येवला
येवला (नाशिक) - गानकोकिळा म्हणून ज्यांची ओळख सर्वदूर असलेल्या अशा लता मंगेशकर यांना अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करत असून, अशाच प्रकारे येवल्यातील कलाकार संतोष राऊळ यांनी अक्षरशः केळीच्या पानावर लतादीदींचे दोन वेगवेगळे चित्र रेखाटत लतादीदींना आगळ्यावेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण केली आहे. यावेळी राऊळ कुटुंबीयांनी या केळीच्या पानाभोवती पणत्या पेटवून लतादीदींना श्रद्धांजली अर्पण केली. या कलाकाराने लता दीदींसोबत एक कोकिळेचे देखील चित्र काढत लतादीदी गानकोकिळा असल्याचे या चित्रातून दाखवले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:12 PM IST