महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Thief Trapped In Temple : चोरी करायला खिडकीतून आत शिरला.. चोर मंदिराच्या भिंतीत अडकला.. - भिंतीच्या खिडकीत चोर अडकला

By

Published : Apr 6, 2022, 6:33 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

श्रीकाकुलम ( आंध्रप्रदेश ) : आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात ( Srikakulam District Andhra Pradesh ) चोरीची एक अनोखी घटना घडली आहे. मंदिरात चोरी करण्यासाठी चोराने मंदिराच्या खिडकीतून आत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र आकाराने छोट्या असलेल्या खिडकीत हा चोर अडकून ( Thief trapped in a wall hole ) पडला. रात्रीच्या सुमारास त्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, खिडकीतून आत जात चोरी करण्याचा त्याचा प्रयत्न त्याच्या चांगलाच अंगलट आला अन् हा चोर खिडकीतच अडकून पडला. कांचिली येथील रहिवासी असलेल्या पापारो याला श्रीकाकुलम जिल्ह्यातील इचापुरम येथील कांचिली झोनमधील जादुपुडी गावकऱ्यांनी रंगेहात पकडले. त्याने जामी इल्लम्मा मंदिरातून चोरी करण्यासाठी मंदिरात प्रवेश केला आणि देवीच्या वस्तू चोरण्याचा प्रयत्न केला. खिडकीतून बाहेर न येता आल्याने गावकऱ्यांनी सकाळी त्याला पकडले. नंतर मंदिराची खिडकी बाजूने तोडून त्याला बाहेर काढण्यात आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details