ही दोस्ती तुटायची नाय..! टाळेबंदीपासून झाली मैत्री, मुलासोबत कोंबडा खेळतो फुटबॉल; पाहा व्हिडिओ - मुलासोबत चक्क कोंबडा खेळतो फुटबॉल
केरळच्या अलप्पुझा येथील करुमाडी शासकीय शाळेतील सहावीत शिकणाऱ्या मिधुनसाठी 'कुट्टप्पन' हे केवळ त्यांच्या घरच्यांनी पाळलेला कोंबडा नसून ते त्याचा एक चांगला मित्रही आहे. कुट्टप्पन नावाचा कोंबडा व 11 वर्षीय मिधुन यांच्यात खूप चांगली गट्टी जमली आहे. मिधुनच्या कुटुंबीयांनी सुमारे दीड वर्षांपूर्वी हा कोंबडा घरी आणला व त्याचे नाव कुट्टपन ठेवले. टाळेबंदीच्या काळात कुट्टप्पन व मिधुन यांच्यात मैत्री झाली. सुरुवातीला कुट्टप्पनने मिधुनला लांबून खेळताना पाहिले, आता तो त्याच्यासोबतच फूटबॉल खेळत आहे. जेव्हा मिधुन आपली सायकल घेऊन फिरायला निघतो त्यावेळी कुट्टप्पनही त्याच्या सोबत जातो. कुट्टप्पन मिधुनचा केवळ मित्रच नाही तर त्याचा सुरक्षा रक्षकही आहे. मिधुनला कोणी रागवत असेल तर त्यांच्या अंगावर धावून जातो. त्याचबरोबर कोणी अनोळखी व्यक्ती मिधुनच्या जवळ जात असेल तर तो त्यांच्या अंगावरही धावतो.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST