Nagpur Factory Fire : नागपूरमध्ये कारखान्यात भीषण आग... ८ दुकाने जळून खाक.. कोट्यवधींचे नुकसान - नागपुरात कारखान्याला भीषण आग
नागपूर : आज सकाळी नागपुरच्या लकडगंज भागातील टिम्बर मार्केटमध्ये ( Nagpur Lakadgunj Timber Market ) असलेल्या एका आरा मशीनच्या कारखान्याला भीषण आग लागली ( Nagpur Factory Fire ) होती. आज दिवसभर आग धुमसत होती. अग्निशमन विभागाच्या ( Nagpur Fire Brigade ) प्राथमिक माहितीनुसार या आगीत 6 आरा मशिन्स आणि 8 दुकाने जाळून राख झाली आहेत. तर कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. लकडगंज परिसरातील टिम्बर मार्केट संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. या मार्केटमध्ये लाकूड आणि त्याच्या संबधित वस्तूंची निर्मिती आणि विक्री केली जाते. आज सकाळी विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे एका दुकानातील आरा मशीनच्या कारखान्याला आग लागली होती. बघता बघता आग अनेक दुकानांमध्ये पसरली. आग लागल्याची माहिती समजताच अग्निशमन दलाचे अनेक बंब घटनास्थळी दाखल झाले होते. सुमारे 12 तास ही आग धुमसत होती. या आगीत कोट्यवधी रुपयांचे टिम्बर जळून राख झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अद्याप अग्निशमन दलाकडून याला दुजोरा देण्यात आलेला नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST