Russia-Ukraine Crisis : युक्रेनमधुन पुण्यातील 16 विद्यार्थ्यांचे आगमन, सांगितला संघर्षमय प्रवास - War in Ukraine
युक्रेन आणि रशियामध्ये गेल्या आठवड्यापासून युद्ध ( Russia-Ukraine Crisis ) सुरू असून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत अण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनमध्ये पुणे जिल्ह्यातील 134 विद्यार्थी हे अडकले होते. यातील 75 विद्यार्थी ( students from Ukraine arrive at Pune Airport ) हे परत आले असून 59 विद्यार्थी हे युक्रेनमध्ये आहेत. युद्धग्रस्त युक्रेनमधून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलेले पुणे शहर आणि जिल्ह्यातील रहिवाशी असलेले 16 विद्यार्थ्यांचे रात्री 1.30 वाजता पुणे विमानतळावर आगमन झाले. यावेळी गिरीश खत्री मित्र परिवाराच्या वतीने पुष्पहार घालून आणि पेढे भरवून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचे कुटुंबीय सुद्धा हजर होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST