हैदराबाद : जेवल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय, आरोग्याला अपायकारक अन्न खाणं, जेवल्यानंतर कोणत्याही प्रकारची हालचाल न करणं… या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला आता कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसला तरी पुढे अनेक समस्या उद्भवू शकतात. पचनाशी संबंधित समस्यांपैकी एक म्हणजे सूज येणं, ज्यामध्ये खाल्ल्यानंतर तुम्हाला फुगल्यासारखे वाटतं. पोट फुगल्यामुळे एखाद्याला अस्वस्थ वाटतं. काही खाण्याची इच्छा होत नाही. कधी कधी वेदना जाणवतात. जर तुम्ही देखील या समस्येने त्रस्त असाल आणि लवकरात लवकर यापासून मुक्ती मिळवू इच्छित असाल तर योग तुम्हाला यामध्ये मदत करू शकते. या समस्येवर कोणती योगासने प्रभावी आहेत, इथे जाणून घ्या.
1.धनुरासन :
- हे आसन करण्यासाठी पोटावर जमिनीवर झोपावं.
- आपले गुडघे वाकवा आणि आपल्या हातांनी गुडघे धरा.
- दीर्घ श्वास घेत हातानं पाय वरच्या बाजूला खेचा.
- हे आसन करताना शरीराचा आकार धनुष्यासारखा दिसेल.
- शक्य तितक्या वेळ या स्थितीत रहा. त्यानंतर श्वास सोडताना खाली या.
- काही काळ या स्थितीत राहिल्यानंतर नॉर्मल स्थितीत या.
- हे 3 ते 5 वेळा पुन्हा करा.