महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 25, 2023, 5:36 PM IST

Updated : Mar 27, 2023, 6:58 AM IST

ETV Bharat / sukhibhava

World Theatre Day 2023 : जाणून घ्या का साजरा करण्यात येतो जागतिक रंगभूमी दिन, काय आहे इतिहास

मराठी रंगभूमीवर अनेक कलावंतांनी आपली कला आजरामर केली आहे. महात्मा फुले यांनी पहिले नाटक लिहिल्याचा इतिहास नमूद असून त्यांच्या नाटकाच्या प्रयोगाला इंग्रजांनी परवानगी नाकारली होती.

World Theatre Day 2022
संग्रहित छायाचित्र

हैदराबाद : भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवात कोल्हापूरमधून झाल्याचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. मात्र रंगभूमीबाबत नागरिकांना फारशी माहिती नाही. नाट्यदिग्दर्शन, वेशभूषा, रंगभूषा, रंगमंच, रंगमंदिर आदी सगळे प्रकार रंगभूमीशी निगडीत आहेत. त्यामुळे राज्यातील विविध कलावंत कीर्तन, नाटक, लोककला या रंगभूमी दिनाशी निगडीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे रंगभूमी दिनाबाबत आपण जाणून घेऊया या खास लेखातून.

काय आहे रंगभूमी दिनाचा इतिहास :भारतीय चित्रपटसृष्टी कोल्हापूरमधून उदयास आली. तसेच रंगभूमीवर कलावंताच्या कलेचे पहिले सादरीकरण कोल्हापूरजवळील सांगली या शहरात झाल्याचे स्पष्ट होते. विष्णूदास भावे यांच्या सीता स्वयंवर या नाटकाचे सादरीकरण सांगलीत १८४३ मध्ये सादर केल्याची नोंद इतिहासात आहे. त्यानंतर युनेस्कोने १९६१ मध्ये इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूने या दिवसाला सुरुवात केल्याचे स्पष्ट होते. युनेस्कोच्या वतीने पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा करण्यात आला होता. त्यामुळे या १९६२ पासून जागतिक रंगभूमी दिनाची सुरुवात झाल्याचे स्पष्ट होते. या दिवशी रंगभूमीवरील महत्वाचा कलावंत एक संदेश इतरांना देत असल्याने याबाबतचा संदेस देण्याचा मान ज्यो कॉक्चू यांनी मिळाला.

महात्मा फुलेंनी लिहिले होते नाटक :महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केल्याचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. मात्र महात्मा फुले यांनी पहिले नाटक लिहिले होते. महात्मा फुले यांनी तृतीय रत्नाकर नावाचे नाटक १८५५ मध्ये लिहिले होते. मात्र ब्रिटीशांनी या नाटकाच्या प्रयोगाला परवानगीच दिली नाही. त्यामुळे त्यांचे हे नाटक प्रयोगाविनाच पडून होते. त्यानंतर मात्र मराठी रंगभूमीचा विकास होत गेला. आता तर व्यावसायीक रंगभूमीवर अनेक नाटकांसहीत चित्रपटांचा भरणा झाला आहे.

काय आहे महत्व : मराठी रंगभूमीवर अनेक कलावंत आपली कला सादर करत आहेत. त्यात झाडी बोली, तमाशा, बहुरुपी, दशावतारी आदी अनेक कलावंत आपल्या कलेची जोपासना करतात. त्यांच्या पाठीशी उभे राहुन सरकारने मदत करने गरजेचे आहे. मराठी कलावंतासाठी हा दिन महत्वाचा मानला जातो. आपल्या कलेची जोपासना करत आयुष्य कलेसाठी वेचलेल्या कलावंताचे स्मरण या दिवशी करण्यात येते. तर कलेला समर्पित आयुष्य असलेल्या कलावंतांचाही या दिवशी सन्मान करण्यात येतो.

हेही वाचा - Ganesh Shankar Vidyarthi : जाणून घ्या कोण होते क्रांतीकारक पत्रकार गणेश शंकर विद्यार्थी

Last Updated : Mar 27, 2023, 6:58 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details