हैदराबाद : सुदृढ आरोग्यासाठी चांगली झोप घेणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही माणसिक आणि शारीरिकदृष्ट्या फिट राहू शकता. मात्र तमावामुळे तुम्हाला झोप आली नाही, तर थकवा जाणवतो, कामात लक्ष लागत नाही. काही नागरिकांना झोप येत नसल्याने हा त्यांच्यासाठी झोप ही डोकेदुखी ठरते. अशा नागरिकांना स्लीप एपनियाचा आजार जडतो. त्यामुळे वेळेवर झोप घेणे आपल्या आरोग्यासाठी गरजेचे असते. जगभरात १७ मार्चला जागतिक झोप दिन पाळण्यात येतो. त्यानिमित्त आरोग्यासाठी महत्त्व असलेल्या झोपेबाबतची माहिती, जाणून घ्या.
काय आहेत स्लीप एपनियाची कारणे : वेळेवर झोप न येण्याच्या त्रासाने अनेक नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे झोपेसाठी काही नागरिकांना झोपेच्या गोळ्याचा आदार घ्यावा लागतो. मात्र तरीही काही नागरिकांना झोप येत नाही. झोपेच्या गोळ्या मानवी शरीरीवर विपरित परिणाम करतात. त्याचे अनेक साईड इफेक्टही आहेत. मात्र झोप न आल्याने काही व्यक्तींना स्लीप एपनिया या आजाराने ग्रासले जाते. त्यामुळे स्लीप एपनिया नेमके काय आहे आणि तो कशामुळे होतो, याबाबतची माहिती जाणून घेणे महत्वाचे ठरते. स्लीप एपनिया होण्याची अनेक कारणे आहेत. घशात अडथळा आल्यामुळे शरीर श्वास घेण्यास मेंदूला सिग्नल पाठवते. मात्र मेंदू ते वाचू शकत नसल्यामुळे जटील समस्या निर्माण होतात. हे वारंवार घडल्यानंतर रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. त्यातून अनेक रोगांना आमंत्रण दिले जाते. वारंवार झोप न झाल्यामुळे स्मृतीभ्रंश होण्याची जास्त शक्यता असते. रक्तदाब, मधुमेह यासारके गंभीर आजाराचा सामना व्यक्तीला करावा लागतो. त्यामुळे थकवा जाणवून चिडचिड होते. चिडचिड झाल्यामुळे व्यक्तीच्या विचारक्षमतेवर त्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
निद्रानाशामुळे होतो विपरित परिणाम :निद्रानाश हा व्यक्तीच्या आरोग्यावर विपरित परिणाम करतो. त्यामुळे व्यक्तीची सतत चिडचिड होते. माणसिक तणावात असलेल्या व्यक्तीला निद्रानाश हा आजार ग्रासण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सकस आहार घेऊन नियमीत व्यायाम करणे, वेळेवर दररोज ८ तास झोप घेणे मानवी शरीरासाठी आवश्यक आहे.
वजनावर अंकुश ठेवण्यासाठी वेळेवर झोप आहे महत्वाची :लठ्ठपणा ही एक जागतिक समस्या आहे. लठ्ठपणामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. लठ्ठपणा हा स्लीप एपनियाला देखील जबाबदार आहे. लठ्ठपणामुळे श्वसनमार्गात अडथळा येऊ शकतो. फुफ्फुसात हवेचा आंशिक किंवा पूर्ण अडथळा आल्याने झोपेचा त्रास होतो. त्यामुळे तुमचे वजन जास्त असल्यास त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करा. त्यासह स्लीप एपनियाचा त्रास होत असल्यास, तुम्ही वजन कमी करण्यासाठी सर्व प्रयत्न केले पाहिजेत.