हैदराबाद :रेड क्रॉस ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. मानवतेच्या कल्याणासाठी ही संस्था कार्यरत आहे. विशेष म्हणजे जखमी सैनिक आणि नागरिकांच्या मदतीसाठी ही संस्था काम करते. इंटरनॅशनल कमेटी ऑफ रेड क्रॉस ही संस्था अनेक संस्थांसोबत मिळून आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करते. यातून नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत करण्याचे काम करण्यात येते. जागतिक रेड क्रॉस दिन 8 मे रोजी साजरा करण्यात येतो.
हेनरी ड्यूनेंट यांनी केली रेड क्रॉस संघटनेची स्थापना :जागतिक रेडक्रॉस दिवस दरवर्षी 8 मे रोजी जगभरात साजरा केला जातो. रेड क्रिसेंट चळवळीची तत्त्वे लक्षात ठेवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जखमी सैनिक आणि नागरिकांचे संरक्षण करणे हा जागतिक रेड क्रॉस दिनाचा मुख्य उद्देश आहे. रेड क्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समितीचे संस्थापक हेनरी डुनेंट यांची जयंती 8 मे रोजी आहे. हेनरी ड्यूनेंट हे रेड क्रॉस संघटनेचे संस्थापक होते. त्यामुळे हेनरी ड्यूनेंट यांच्या कार्याची आठवण म्हणून 8 मे रोजी जागतिक रेड क्रॉस दिवस साजरा करण्यात येतो.
कोरोनाच्या काळात महत्वाचे काम :रेड क्रॉस ही आंतरराष्ट्रीय संस्था असून या संस्थेचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे आहे. इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉस आणि अनेक राष्ट्रीय संस्था मिळून ही संस्था चालवण्याते येते. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या काळात या संघटनेने मोठ्या प्रमाणात नागरिकांची सेवा केली. त्यामुळे रेड क्रॉस चळवळीचे महत्त्व अधिकच समर्पक झाले आहे.
काय आहे रेड क्रॉस संघटनेचे महत्व :युद्धातील जखमी सैनिकांना पाहुन व्यथित झालेल्या हेनरी ड्यूनेंट यांनी रेड क्रॉस संस्था स्थापन करण्याचे ठरवले होते. त्यामुळे जखमी सैनिक, नागरिकांची सेवा करण्यासाठी रेड क्रॉस ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. जागतिक रेड क्रॉस सोसायटीचे कार्य नेहमीच सुरूच असते. कोणत्याही आजाराच्या किवा युद्धाच्या संकटात रेड क्रॉस संघटनेचे स्वयंसेवक नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असतात. मात्र कोरोना महामारीच्या काळात रेड क्रॉस संघटनेचे काम आणखी वाढले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रेड क्रॉस संघटना युद्धपातळीवर काम करत आहे. या संस्थेशी संबंधित लोक कोरोनापासून बचाव करण्यासाठी जगभरातील गरजू नागरिकांची सेवा करत आहेत. यासोबतच नागरिकांना मास्क, हातमोजे आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात येत आहे.