हैदराबाद : पार्किन्सन्स हा आजार मेंदूचा विकार असून बहुतेकदा हा आजार वृद्धापकाळात होतो. आजही नागरिकांमध्ये या प्राणघातक आजाराबाबत अचूक माहितीचा अभाव आहे. त्यामुळे या आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी 11 एप्रिल हा जागतिक पार्किन्सन्स दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पार्किन्सन्स दिनी या आजाराबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केल्या जातात. यावर्षीचा जागतिक पार्किन्सन्स दिन #Take6forPD या थीमसह साजरा करण्यात येत आहे.
पार्किन्सन आजारावर नाही उपचार :पार्किन्सन हा रोग मेंदूतील विशिष्ट पेशींना नुकसान झाल्यामुळे हालचालींवर परिणाम करतो. या आजाराने पीडीत व्यक्तीचे हातपायही थरथर कापतात. त्यासह पीडीत व्यक्तीला स्नायू कडक झाल्याचे जाणवतात. शारीरिक संतुलन राखण्यात अडचण येते. अशा समस्यांच्या विकासामुळे याला प्रोग्रेसिव्ह न्यूरोडीजेनेरेटिव्ह डिसऑर्डर असेही म्हणतात. या आजारावर कोणताही उपचार नसला तरी, पार्किन्सन्स रोगाची लक्षणे काही खाद्यपदार्थ योग्यरित्या खाल्ल्याने सहज नियंत्रित करता येत असल्याचा दावा तज्ज्ञ व्यक्त करतात.
काय आहेत पार्किन्सन आजाराची लक्षणे :पार्किन्सन्स आजार (PD) हा एक न्यूरोडीजेनेरेटिव्ह डिसऑर्डर आहे. तो प्रामुख्याने मेंदूच्या विशिष्ट भागामध्ये डोपामाइन उत्पादक (डोपामिनर्जिक) न्यूरॉन्सला प्रभावित करतो. त्याला सब्सटॅनिया निग्रा असेही म्हणण्यात येते. या आजारांच्या लक्षणांबद्दल सहसा लवकर माहिती मिळत नाही. हा आजार बऱ्याच वर्षांपासून हळूहळू विकसित होत जातो. रोगाच्या विविधतेमुळे लक्षणांचे स्वरूप अनेकदा व्यक्तीनुसार बदलत असल्याचा दावाही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ करतात. याबाबतची माहिती Parkinson.org वर प्रकाशित झालेली आहे.
पार्किन्सन रोगाची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.
- विश्रांतीच्या वेळी हात पाय थरथर कापतात
- चालताना संतुलनाचा त्रास होतो
काय आहेत पार्किन्सन आजाराची कारणे :पार्किन्सन्स आजाराचे नेमकी कारणे काय आहेत, याबद्दल अद्यापही पुरेशी माहिती नाही. पार्किन्सन आजारावर कोणताही उपचार नसला तरी उपचाराचे विविध पर्याय आहेत. यात औषधोपचार आणि शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे. पार्किन्सन आजार हा प्राणघातक नाही, परंतु या आजाराची गुंतागुंत गंभीर असू शकते. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या अहवालानुसार पार्किन्सन्स आजारामुळे युनायटेड स्टेट्समध्ये मृत्यूचे 14 वे प्रमुख कारण आहे.
पार्किन्सन आजारावर मिळवता येते नियंत्रण :आहारात काही बदल करून हा आजार आटोक्यात ठेवता येतो. त्यामुळे अँटिऑक्सिडंट्स, फिश ऑइल, जीवनसत्त्व बी१, सी आणि डी असलेले पदार्थ खाणे महत्त्वाचे असल्याचा दावा करण्यात येतो. अनेक संशोधनातून ओमेगा 3 फॅटी अॅसिडस् मज्जातंतूचा दाह कमी करण्यास, न्यूरोट्रांसमिशन वाढवण्यास आणि मज्जातंतूंचा ऱ्हास रोखण्यास मदत करू शकतात असा दावा तज्ज्ञांकडून करण्यात येतो. या आजाराच्या रुग्णांना ओमेगा ३ फॅटी फिश किंवा ओमेगा ३ सप्लिमेंट्स दिल्यास अनेक फायदे होतात. या आजाराने पीडित नागरिकांनी जास्त साखर, मीठ, प्रक्रिया केलेले पदार्थ, उच्च कोलेस्ट्रॉलयुक्त पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ, चीज, कमी चरबीयुक्त दूध, दही, सॅच्युरेटेड फॅट्स आदी खाणे टाळण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येतो. या रुग्णांना सहसा गिळण्यास आणि चघळण्यास त्रास होतो. त्यांना मांस खाण्याची परवानगी देऊ नये असेही तज्ज्ञ स्पष्ट करतात.
हेही वाचा - National Safe Motherhood Day 2023 : भारतात दरवर्षी 45 हजार मातांचा होतो मृत्यू, जाणून घ्या राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवसाचा इतिहास