हैदराबाद : आंतरराष्ट्रीय समुदायाकडून दरवर्षी १० डिसेंबर रोजी मानवी हक्क दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 1948 मध्ये मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणा स्वीकारली. त्या दिवसाचे आज स्मरण केले जातं आहे. मानवी हक्क दिनाची औपचारिक सुरुवात 1950 मध्ये झाली. जेव्हा संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेनं मानवी हक्काचा ठराव 423 (V) संमत केला. जगभरातील देश आणि इच्छुक संस्थांना दरवर्षी 10 डिसेंबर हा मानवाधिकार दिन म्हणून स्वीकारण्याचे आमंत्रण दिले.
- मानवी हक्क दिन का साजरा केला जातो?कोणत्याही व्यक्तीचा जगण्याचा हक्क, स्वातंत्र्य, समानता आणि आदर हा मानवी हक्कांतर्गत येतो. परंतु बहुतेक लोकांना या अधिकारांची माहिती नसते. त्यांना या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठीच मानवी हक्क दिन साजरा केला जातो.
- भारतातील मानवाधिकार कायदा : भारत सरकारनं 12 ऑक्टोबर 1993 रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना केली. हा कायदा 28 सप्टेंबर 1993 पासून लागू झाला. नागरी आणि राजकीय हक्कांसोबतच आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कही आयोगाच्या अंतर्गत येतात.
- मानवाधिकार दिनाची पार्श्वभूमी :1948 मध्ये मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणा स्वीकारल्याच्या दिवसापासून संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे मानवाधिकार दिन साजरा केला जातो. पहिल्यांदाच 48 देशांनी हा दिवस संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत साजरा केला.