महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

World Homeopathy Day 2023 : होमिओपॅथीत शोधले जाते आजाराचे मूळ, मग दुर्धर आजारावर करण्यात येतो उपचार - औषधी

होमिओपॅथीचे जनक डॉ क्रिस्टीएन फ्रेडरिक सॅम्युअल हॅनिमेन यांनी होमिओपॅथी उपचार पद्धतीचा शोध लावला आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मदिवशी जागतिक होमिओपॅथी दिन साजरा करण्यात येतो.

World Homeopathy Day 2023
संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 7, 2023, 3:29 PM IST

Updated : Apr 10, 2023, 7:51 AM IST

हैदराबाद : होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीने रुग्णांना अनेकदा नवसंजिवनी दिली आहे. त्यामुळे होमिओपॅथी उपचार पद्धतीचा रुग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याचे दिसून येते. भारतात दरवर्षी 10 एप्रिलला होमिओपॅथी दिवस साजरा करण्यात येतो. या होमिओपॅथीचे जनक डॉ क्रिस्टीएन फ्रेडरिक सॅम्युअल हॅनिमेन यांचा जन्म जर्मीनीत झाला. सॅम्युअल हॅनिमेन यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या जन्मदिवशी जागतिक होमिओपॅथी दिवस साजरा करण्यात येतो.

कोण होते सॅम्युअल हॅनिमेन :सॅम्युअल हॅनिमेन यांचा जन्म जर्मनीमधील अतिशय गरीब घरात 1755 ला झाला होता. त्यांना रोजगारासाठी अनेक छोटीमोठी कामे करावी लागली. हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी आपल्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. असेच एका ठिकाणी काम करत असताना त्यांच्याकडे कुलेन्स मटेरिया मेडिका या पुस्तकाच्या अनुवादाचे काम त्यांच्याकडे आल्याने त्यांनी ते आनंदाने केले. मात्र या पुस्तकात विविध औषधी गुणधर्माची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे सॅम्युअल हानेमन यांना या विषयात चांगलाच रस निर्माण झाला. हानेमन यांनी या पुस्तकाचे अनुवाद करताना अनेक औषधी गुणधर्माच्या वनस्पतीविषयी माहिती मिळवली.

स्वत:वर केला औषधांचा प्रयोग :सॅम्युअल हानेमन यांनी अनुवाद केलेल्या कुलेन्स मटेरिया मेडिका या पुस्तकात वनौषधींची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी या पुस्तकातील अनेक औषधी वनस्पतींची माहिती गोळा केली. यात पेरुवियन बार्क नावाच्या झाडाची साल मलेरियावर प्रभावी असल्याची माहिती या पुस्तकात नमूद करण्यात आली होती. त्यामुळे सॅम्युअल हानेमन यांनी त्या झाडाची साल काढून त्यापासून औषधी तयार केली. मात्र त्यांना त्याचा त्रास जाणवू लागला. सॅम्युअल हानेमन यांना त्यांच्या आजारांची आणि मलेरियाची लक्षणे सारखी असल्याचे जानवल्याने त्यांनी ही उठाठेव केली होती. मात्र ही औषधी घेणे बंद केल्यावर त्यांच्या आजारावरही फरक जाणवू लागला. त्यांचा आजार बरा झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे सॅम्युअल हानेमन यांनी अशाप्रकारची अनेक औषधी तयार करुन त्याचा आपल्यावर प्रयोग करुन पाहिला. त्यातून अनेक औषधांचा शोध लागत गेला.

होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीचे मांडले तत्वज्ञान :सॅम्युअल हानेमन यांनी अनेक औषधांचा शोध लावल्यानंतर ती औषदी अगोदर आपण घेऊन पाहिली होती. त्यात फरक जाणवल्यास ते याबाबत खात्री करुन दुसरी औषधी शोधण्याच्या कामाला लागत होते. सॅम्युअल हानेमन यांनी निरोगी माणसाला आजाराची लक्षणे निर्माण करणारी औषधी दिल्यास त्या औषधांमुळे आजार बरा होऊ शकतो, असा शोध लावला. त्यामुळे त्यांनी आपल्या या संशोधनाची माहिती 1796 ला जगाला देत होमिओपॅथी चिकित्सा पद्धती आणि तत्त्वज्ञान उजागर केले. त्यामुळे सॅम्युअल हानेमन यांना होमिओपॅथीचे जनक असे म्हटले जाते. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या जन्मदिवशी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने 10 एप्रिल हा जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे.

हेही वाचा - Easter Sunday 2023 : प्रभू येशूंचा पुनर्जन्म झाल्याचा दिवस म्हणून साजरा करतात ईस्टर संडे; जाणून घ्या ईस्टर संडेचा इतिहास

Last Updated : Apr 10, 2023, 7:51 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details