महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

World Forest Day 2023 : वृक्षवल्ली आम्हा सोयरे, पण तरी होते दरवर्षी 'इतक्या' वृक्षाची कत्तल - दरवर्षी हजारो वृक्षांची कत्तल

नागरिकांमध्ये वृक्षांबाबत जनजागृती होण्यासाठी २१ मार्चला जागतिक वनदिवस साजरा करण्यात येतो. मानवाला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे, तरीही मानवाने आपल्या विकासासाठी हजारो वृक्षांची दररोज कत्तल करणे थांबवले नाही.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Mar 20, 2023, 8:18 PM IST

Updated : Mar 21, 2023, 9:09 AM IST

हैदराबाद : जगदगुरू संत तुकाराम महाराज यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे असा अभंग लिहून वृक्षांचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मानवाला जगण्यासाठी ऑक्सिजन आवश्यक आहे. हा ऑक्सिजन आपल्याला वृक्षांकडून मिळतो. मात्र तरीही दरवर्षी हजारो वृक्षांची कत्तल करण्यात येते. वृक्षसंवंर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने २१ मार्च हा जागतिक वनदिवस म्हणून साजरा करण्यात येते. या दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

दरवर्षी १३ दशलक्ष हेक्टरवरचे जंगल होते नष्ट :मानवाने आपला औद्योगिक विकास करण्यासाठी जंगलावर कुऱ्हाड चालवली आहे. त्यामुळे दरवर्षी तब्बल १३ दशलक्ष हेक्टरवरील जंगल नष्ट होत असल्याची संयुक्त राष्ट्र संघाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होते. मानवाला ऑक्सिजनशिवाय जगता येत नाही. हा ऑक्सिजन आपल्याला झाडांपासून मिळत असूनही मानवाने झाडावर कुऱ्हाड चालवली आहे. अनेक औद्योगिक प्रकल्पासाठी मानवाने वृक्षांची कत्तल सुरू केली आहे. त्यामुळे हजारो एकरावरील जंगले नष्ट होत आहेत.

काय आहे वनदिवसाचा इतिहास : नागरिकांमध्ये वृक्षांबाबत जनजागृती करणे आवश्यक होते. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाने यासाठी पुढाकार घेतला. जागतिक अन्न आणि कृषी संघटनेच्या २३ व्या १९७१ च्या बैठकीत याबाबतची संकल्पना पुढे आली. त्यानंतर २८ नोव्हेंबर २०१२ ला जागतिक वनदिवस साजरा करण्याचा ठराव पास केला. संयुक्त राष्ट्र संघाने ठराव पास केल्यानंतर २१ मार्च २०१३ मध्ये प्रथमच जागतिक वनदिवस साजरा करण्यात आला आहे. तेव्हापासून आजतागायत २१ मार्च हा दिवस जागतिक वनदिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

काय आहे जागतिक वनदिनाची थीम : संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने जागतिक वनदिनाची दरवर्षी एक थीम घेऊन जनजागृती करण्यात येते. २१ मार्च २०२१ ला शाश्वत वननिर्मिती आणि त्याचा योग्य वापर ही थीम घेऊन संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने जनजागृती करण्यात आली होती. पृथ्वीवर असलेली जैवविविधता समृद्ध होण्यासाठी ही थीम वापरण्यात आली होती.

हेही वाचा - Children Build Better Learning Skills : शिकवणारा शिक्षक जर समान वंशाचा असेल तर मुलांमध्ये वाढतात ही कौशल्य

Last Updated : Mar 21, 2023, 9:09 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details