हैदराबाद :World Food Day 2023 निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी कमी प्रमाणात पौष्टिक आणि सकस आहार घेणं खूप महत्वाचं आहे. डॉक्टर आणि तज्ज्ञांकडून सर्व वयोगटातील आणि सर्व लोकांना निरोगी राहण्यासाठी आवश्यक प्रमाणात पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला देण्यात येतो. परंतु कधी आर्थिक कारणांमुळे किंवा काही वेळा आवश्यक प्रमाणात धान्य न मिळणं यासह विविध कारणांमुळं अनेकांना आवश्यक प्रमाणात धान्य मिळू शकत नाही. 'जागतिक अन्न दिन' म्हणजे लोकांना चांगल्या आरोग्यासाठी सकस आहाराची गरज असल्याची जाणीव करून देण्याची संधी आहे. तसेच शेतीच्या माध्यमातून आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न करण्याची आणि प्रत्येक व्यक्तीसाठी अन्नाची उपलब्धता सुनिश्चित करण्याची संधी आहे. यावर्षी हा दिन “पाणी हे अन्न, पाणी हे जीवन आहे. यापासून कोणीही वंचित राहणार नाही. ही थीम आहे.
इतिहास आणि उद्दिष्ट :सुरक्षित अन्न उत्पादन आणि वापराबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढवणं एवढंच नाही तर प्रत्येक व्यक्तीला पुरेसं अन्न उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणं, अन्नाची नासाडी रोखणं ही या दिवसाची उद्दिष्टे आहेत. लोकांना केवळ समाजात किंवा मोठ्या गटात अन्न उत्पादनाच्या दिशेनं प्रयत्न करण्यास प्रवृत्त केले जाते. तसेच एकल किंवा कुटुंबासारख्या लहान घटकांनाही किचन गार्डनसारखी छोटी शेती किंवा शेतीचा अवलंब करण्यास प्रवृत्त केलं जातं. जेणेकरुन अधिकाधिक लोकांना मोठ्या किंवा लहान गटांमध्ये अन्न उत्पादन करण्यास प्रोत्साहन मिळू शकेल.
अन्नाला समान हक्क म्हणून मान्यता-'जागतिक अन्न दिना'ची स्थापना 16 ऑक्टोबर 1979 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेनं जागतिक उपासमारीचा सामना करण्यासाठी आणि जगभरातील भूक निर्मूलनासाठी प्रयत्न करण्याच्या उद्देशानं केली होती. याआधी संयुक्त राष्ट्रसंघाने अन्नाला समान हक्क म्हणून मान्यता दिली होती. परंतु प्रत्येक व्यक्तीसाठी सकस आहाराची गरज समजून आणि स्वीकारून 1945 साली संयुक्त राष्ट्रसंघानं अन्न हा सर्वांसाठी विशेष हक्क म्हणून मान्यता दिली.
'जागतिक अन्न दिन' 2023चेमहत्त्व : तज्ज्ञांचे म्हणणे आहे की , जगात अन्न व्यवसायात बरीच प्रगती होत असली तरीही जगातील अनेक देशांना आजही सकस आहाराचा अभाव आणि अन्न उत्पादनात घट होत आहे. याला महागाई, गरिबी, सामाजिक विषमता, पर्यावरणीय समस्या, युद्ध, साथीचे रोग यासारखी परिस्थिती जबाबदार आहे. ही परिस्थिती केवळ एक-दोन देशांमध्येच नाही तर जगातील अनेक देशांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. म्हणूनच तज्ज्ञ याला गंभीर जागतिक समस्या मानतात.
कुपोषणापासून आपल्या देशाची मोठी लोकसंख्या त्रस्त : संयुक्त राष्ट्रांच्या 'द स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड 2022' या अहवालात भारतातील 97 कोटींहून अधिक लोक, म्हणजे देशाच्या सुमारे 71% लोकसंख्येला पौष्टिक अन्न परवडत नाही, असे म्हटले आहे. तर नेपाळमध्ये हा आकडा 84%, पाकिस्तानात 83.5%, श्रीलंकेत 49%, ब्राझीलमध्ये 19% आणि चीनमध्ये 12% इतका आहे. या अहवालाच्या निकालांबाबत जगातील अनेक देशांमध्ये काही फरक दिसला असला, तरी अनेक देशांतील मोठ्या संख्येने लोक विविध कारणांमुळे पुरेसे सकस आहार घेऊ शकत नाहीत हे नाकारता येत नाही. त्याचाच एक परिणाम कुपोषणाच्या रूपातही दिसून येतो. या अहवालात असे म्हटले आहे की, अन्न उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. डाळी, तांदूळ, गहू, मासे, दूध आणि भाजीपाला उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर असला तरी अजूनही कुपोषणापासून आपल्या देशाची मोठी लोकसंख्या त्रस्त आहे. अहवालात दिलेल्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये जगातील 76.8 कोटी लोक कुपोषणाचे बळी असल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी 22.4 कोटी म्हणजे सुमारे 29% भारतीय होते.
- या विषयांवर चर्चा : 'जागतिक अन्न दिन' म्हणजे कुटुंब, समूह, समुदाय आणि राष्ट्रीय स्तरावर शेतीच्या माध्यमातून आरोग्य आणि अर्थव्यवस्था या दोन्हींच्या उन्नतीसाठी प्रयत्न करण्याची संधी आहे. यानिमित्तानं विविध देशांत त्यांच्या सरकारी व निमसरकारी संस्थांमार्फत चर्चासत्रे, जनजागृती मोहीम, प्रशिक्षण कार्यक्रम आदींचे आयोजन केले जाते.
हेही वाचा :
- World Egg Day 2023 : जागतिक अंडी दिन 2023; या दिनानिमित्त जाणून घ्या अंडी खाण्याची योग्य वेळ...
- World Handwashing Day 2023 : 'ग्लोबल हँडवॉशिंग डे' 2023; जाणून घ्या काय आहे उद्देश आणि इतिहास
- World Spine Day २०२३ : वर्ल्ड स्पाइन डे 2023; जाणून घ्या, मणक्याची योग्य काळजी कशी घ्यावी?