हैदराबाद - कर्करोगाच्या रुग्णांमध्ये येत्या काही वर्षात खूप नाट्यमयरीत्या वाढ झाली आहे. त्यामुळे जागतिक मृत्यूंमध्ये कर्करोगाने होणारे मृत्यू दुसऱ्या क्रमांकावर आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्याप्रमाणे २०१८ मध्ये ९.६ दशलक्ष मृत्यू कर्करोगामुळे झाले आहेत. जगभरात ६ मृत्यूंमध्ये १ मृत्यू हा कर्करोगाने होतोय. कर्करोग मुख्यत: पुढील प्रकारात होतात.
- फुफ्फुसे ( २.०९ दशलक्ष रुग्ण )
- स्तन ( २.०९ दशलक्ष रुग्ण )
- कोलोरेक्टल ( १.८० दशलक्ष रुग्ण )
- प्रोस्टेट ( १.२८ दशलक्ष रुग्ण )
- त्वचेचा कर्करोग ( १.०४ दशलक्ष रुग्ण )
- पोट ( १.०३ दशलक्ष रुग्ण )
दर वर्षी ४ फेब्रुवारीला कर्करोगाबद्दल जनजागृती वाढवण्यासाठी आणि लोकांना याबद्दल शिक्षण देण्यासाठी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. या जीवघेण्या रोगाविरुद्ध लढा देण्यासाठी जगभरातील प्रत्येकाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो. कर्करोग,रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रे (सीडीसी) द्वारे परिभाषित केल्याप्रमाणे,या रोगामध्ये असामान्य पेशी नियंत्रणाबाहेर विभाजित होतात आणि त्या इतर टिश्यूंवर आक्रमण करण्यास सक्षम असतात. कर्करोग रक्त आणि लसिकांमार्फत शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतो. त्यांच्यामुळे शरीरातले विषारी पदार्थ बाहेर पडायला लागतात.
कर्करोगाबद्दल असलेले काही गैरसमज -
कर्करोग संसर्गजन्य आहे
बहुतेक कर्करोग हे संसर्गजन्य नसतात.पणव्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे उद्भवणारे काही कर्करोग एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीमध्ये पसरतात. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च (आयजेएमआर) च्या मते, “ गर्भाशयाच्या खालच्या भागाचा कर्करोग (मानवी पॅपिलोमा विषाणूमुळे होतो) आणि यकृत कर्करोग (हेपेटायटीस बी आणि सी विषाणूमुळे होतो) या व्यतिरिक्त,कर्करोगाचे इतर कोणतेही रूप संक्रमक नाही. रक्ताचे संक्रमण,एकच सुया अनेकांना टोचल्या आणि असुरक्षित लैंगिक संबंध यामुळेच या संसर्गजन्य असलेल्या कर्करोगाचे संक्रमण होते.
कर्करोग हा नेहमीच जीवघेणा असतो
नाही. कर्करोग हा नेहमीच जीवघेणा नसतो. औषध आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती झाल्यावर अनेक उपचार आता उपलब्ध आहेत. म्हणूनच,कर्करोगाच्या उपचारानंतरचे रुग्ण जिवंत राहण्याचे प्रमाण आता जास्त आहे. पण रुग्ण जगेल की नाही किंवा किती वर्ष जगेल हे कर्करोग शरीरतल्या कुठल्या भागात आणि किती पसरला आहे, यावर अवलंबून असते. याशिवाय परिणामकारक उपचार उपलब्ध आहे की नाही, व्यक्तीचे एकूण आरोग्य यावरही हे अवलंबून आहे.
डिओडरंटमुळे स्तनाचा कर्करोग होतो
नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटच्या मते अनेक अभ्यासावरून असे आढळून आले आहे की, डिओटरंटमधल्या रसायनांमुळे स्तनातल्या टिश्यूंमध्ये काहीही बदल होत नाही.
फक्त धूम्रपान करणाऱ्यांना फुफ्फुसाचा कर्करोग होतो