हैदराबाद : पुस्तक हा भविष्यकाळ आणि भुतकाळातील महत्वाचा दुवा म्हणून काम करते. भारतीय संस्कृतीचे जतन करण्यात पुस्तकांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे पुस्तकाने अनेक पिढ्याला घडवण्याचे काम केले आहे. जगभरात पुस्तकांच्या बाबत जनजागृती करण्यासाठी 23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
काय आहे पुस्तक दिनाचा इतिहास :नागरिकांना वाचनाची गोडी लावण्यासाठी पुस्तक दिन जगभरात साजरा करण्यात येतो. यावर्षी पुस्तकाची राजधानी अर्थात वर्ल्ड बुक कॅपीटल मलेशियातील क्वलालंपूर येथे असणार आहे. स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी 23 एप्रिल 1923 मध्ये पहिल्यांदा पुस्तक दिन साजरा केला. त्यानंतर 1995 मध्ये पॅरिसमधील युनेस्कोची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत जागतिक पुस्तक दिन साजरा करण्याचे घोषित करण्यात आले. 23 एप्रिल हा दिवस जागतिक दर्जाचे लेखक विल्यम सेक्सपिअर, मिगुएल सर्व्हंटिस, इंका गार्सिलोसो आदींचा स्मृतीदिन आहे. त्यांच्या स्मृतीदिनी जागतिक पुस्तक दिन साजरा करण्याचे युनेस्कोने जाहीर केले. तेव्हापासून 23 एप्रिलला जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात येतो.
काय आहे पुस्तक दिनाचे महत्व :पुस्तकामुळे नागरिकांना जगण्याचे विविध मार्ग सापडतात. पुस्तक आयुष्याला दिशा देण्याचे काम करते. त्यामुळे प्रत्येकाने वाचन करणे गरजेचे आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तुमच्या जवळ दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या. भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल, मात्र पुस्तक तुम्हाला कसे जगायचे ते शिकवील, असे स्पष्ट केले आहे. त्यावरुन मानवाच्या आयुष्यात पुस्तकाला किती महत्व आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळे पुस्तक दिनाच्या दिवशी नागरिकांना वाचनातून गोडी निर्माण होण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
काय आहे यावर्षीची थीम :जागतिक पुस्तक दिनाला युनेस्कोच्या वतीने दरवर्षी एक थीम घेऊन त्यावर जनजागृती करण्यात येते. त्यासह या थीमला घेऊन विविध कार्यक्रमाचे आयोजनही युनेस्कोच्या वतीने करण्यात येते. 2022 ला युनेस्कोने तुम्ही वाचक आहात You Are A Reader ही थीम घेऊन जनजागृती केली होती. मात्र यावर्षी युनेस्कोने तुमचा जागतिक पुस्तक दिन Yours Book Day अशी थीम घेऊन कार्य करण्याचे ठरवले आहे.
हेही वाचा - World Liver Day 2023: आज जागतिक यकृत दिन; निरोगी जीवनासाठी यकृताची 'अशी' घ्या काळजी