महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

महिलांनो आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, 'या' समस्यांकडे वेळीच लक्ष द्या, अन्यथा..

सामान्यत: महिलांच्या शरीरामध्ये मासिक पाळी आणि जननेंद्रियसंबंधी अनेक समस्या एका वयानंतर होऊ लागतात. मात्र, अनेकवेळा माहिती अभावी आणि अनेकदा आपल्या समस्यांकडे ( unusual symptoms in the body ) दुर्लक्ष करण्याच्या सवयीमुळे महिला त्यावर लक्ष देत नाही, जे योग्य नाही.

WOMEN
महिला

By

Published : Dec 14, 2021, 5:41 PM IST

Updated : Dec 14, 2021, 6:26 PM IST

एका वयानंतर प्रौढ महिलांमध्ये मासिक व जननेंद्रियसहित अन्य प्रकराच्या आरोग्य समस्या अधिक प्रमाणात दिसून येतात. सामान्यत: जो पर्यंत समस्येचा प्रभाव शरीरावर वेदनेच्या रुपात किंवा अन्य गंभीर रुपात दिसून येत नाही, तोपर्यंत महिला त्याकडे लक्ष देत नाहीत. बहुतेक प्रकरणांमध्ये, त्यांना त्यांच्या शरीरात होत असलेल्या बदलांची जाणीव देखील नसते, ज्यामुळे त्यांना त्यांच्या शरीरामध्ये होणाऱ्या बदलांबाबत माहिती देखील होत नाही. या पार्श्वभूमीवर आज आम्ही प्रौढ महिलांमध्ये दिसून येणाऱ्या काही समस्या व रोग आणि त्यांच्या लक्षणांबाबत ( unusual symptoms in the body ) माहिती देत आहोत.

पीएमएस (PMS)

मासिक पाळी दरम्यान महिलांना अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु, पीएमएसने ग्रस्त महिलांना अधिक समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्येत सामान्यत: मासिक पाळी येण्यापूर्वी पोटदुखी, कंबंरदुखी, स्तनदुखी आणि सूज आदी लक्षणे जाणवतात. महिलांमध्ये पीएमएसची पातळी वयानुसार विविध असते, मात्र काही महिला त्यास 20 ते 25 या वयांमध्ये अनुभवू शकतात. त्याचबरोबर, ज्या महिलांचे वय 30 पेक्षा अधिक आहे त्यांच्यात पीएमएसची लक्षणे कमी होऊ शकतात, कारण मेनोपॉजच्या स्थितीत जाण्यापूर्वी समस्या वाढू शकते.

पीएमएसची लक्षणे अनेक महिलांमध्ये सामान्य असतात, ज्यांच्याबाबत त्यांना माहिती देखील होत नाही. अनेदा काही प्रकरणांमध्ये मासिक पाळीच्या दोन आठवड्यांआधीच त्याची लक्षणे जाणवू लागतात. अनेकदा पीएमएस एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोनमुळे देखील होऊ शकते. पीएमएसची सामान्य लक्षणे पुढील प्रमाणे आहेत.

1) पुरळ येणे.

2) पोट दुखी, अतिसार किंवा बद्धकोष्ठता.

3) थकवा, चिडचिड, तणाव, नैराश्य किंवा उदास वाटणे.

4) स्तनांमध्ये वेदना होणे किंवा मळमळ.

5) डोकेदुखी.

6) पोटात सूज आल्याची भावना.

अनियमित पीरियड

अनियमित मासिक पाळी ही महिलांमध्ये होणारी सामान्य समस्या आहे. अनेकदा ही समस्या थोडी खबरदारी आणि उपचार घेतल्याने बरी होते, मात्र अनेक प्रकरणांमध्ये ती कोण्या गंभीर आजाराचे लक्षण देखील असू शकते. त्यामुळे, या समस्येकडे दुर्लक्ष करू नये. साधारणपणे निरोगी महिलेच्या मासिक चक्राचा कालावधी 21 ते 35 दिवसांदरम्यान असतो. जर एका मासिक पाळीनंतर दुसरी मासिक पाळी व्हायला उशीर झाला असेल किंवा या दोन मासिक पाळी होण्यामधील अंतर खूप कमी असेल, तर त्यास अनियमित पीरियड असे म्हणतात. या समस्येला बहुतांशवेळा तणाव कारणीभूत असल्याचे मानले जाते. तज्ज्ञ सांगतात की, तनावाचा थेट प्रभाव एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोन हार्मोन्सवर पडतो, ज्यामुळे मासिक पाळीत अनियमितता वाढते.

तेच अनेकदा दीर्घ आजारामुळे किंवा थायरॉईडमुळे देखील महिलांना अनियमित पीरियडची समस्या होते. अनियमित मासिक पाळीचे पहिले लक्षण म्हणजे गर्भाशयात वेदना. त्याचबोरबर, भूक कमी लागणे, स्तन, पोट, हात - पाय आणि कंबरेत वेदना, अधिक थकवा, बद्धकोष्ठता आणि अतिसार ही देखील त्याची लक्षणे आहेत.

एंडोमेट्रिओसिस

एंडोमेट्रिओसिस हा गर्भाशयामध्ये होणारा आजार आहे. यात गर्भाशयाचे आतील थर (आंतरिक परत) बनवणाऱ्या एंडोमेट्रियल ऊतकामध्ये असामान्य वाढ होऊ लागते आणि ते गर्भाशयाच्या बाहेर इतर अंगांमध्ये पसरू लागते. यामुळे पीरियडदरम्यान अधिक रक्तस्त्राव आणि पोट दुखण्याची समस्या होते.

एंडोमेट्रिओसिस ही खूप सामान्य समस्या आहे. एंडोमेट्रिओसिस सोसायटी ऑफ इंडियानुसार, जवळजवळ 25 मिलियन भारतीय महिलांमध्ये ही समस्या आढळते. मासिक पाळीदरम्यान खूप दुखणे हे याचे सर्वात पहिले आणि सामान्य लक्षण आहे. याच्याव्यतिरिक्त मासिक पाळी दरम्यान अत्याधिक रक्तस्त्राव होणे, सेक्सदरम्यान किंवा नंतर तीव्र वेदना होणे, शौच किंवा लघवी करताना वेदना किंवा रक्तस्त्राव होणे, अधिक थकवा, चक्कर येणे, बद्धकोष्ठता आणि निसंतानता ही त्याच्या मुख्य लक्षणांपैकी एक आहे.

सर्विकल पॉलिप्स

सर्विकल पॉलिप्स हे छोटे असतात, जे सर्विकल म्युकोसा ( cervical mucosa ) किंवा एंडोसर्विकल कॅनल ( endocervical canal ) आणि गर्भाशयाच्या तोंडावर होतात. ते तयार झाल्याने देखील पीरियडदरम्यान अधिक ब्लिडींग होते. ते तयार होण्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही, मात्र वैद्यकीय जगतात अस्वछता आणि संसर्ग हे त्याच्या निर्मितीमागचे कारण मानले जाते.

पेल्विक इन्फ्लामेटोरी डिसीज ( PID )

पेल्विक इन्फ्लामेटोरी डिसीज म्हणजे श्रोनी सूजेचा आजार एक संसर्ग आहे, जो तुमच्या गर्भाशय, अंडाशय आणि फॅलोपियन ट्यूबवर परिणाम करू शकतो. पीआरपी ट्रिटमेंटला अँटिबायोटिक थेरेपीच्या रुपात सजेस्ट केले जाते. पीआईडी झाल्यास पोट आणि शरीरात अस्वस्थतेसह पोट किंवा श्रोणी क्षेत्रात वेदना, संभोग दरम्यान तीव्र वेदना, योनीमधून असमान्य किंवा अत्याधिक रक्तस्त्राव, संभोगनंतर रक्तस्त्राव किंवा परत एक मासिक पाळी ते दुसऱ्या मासिक पाळीदरम्यानच्या कालावधीत स्पॉटिंग, पिवळा, हिरवा किंवा दुर्गंधीयुक्त योनिस्त्राव आणि गुदद्वारात वेदनासारखी लक्षणे दिसू शकतात.

वजाइनल इन्फेक्शन ( Vaginal Infection )

वजाइनल इन्फेक्शनला वजाइनल कॅन्डीडायसिस ( Vaginal Candidiasis ) किंवा यिस्ट संसर्ग देखील म्हणतात. ही समस्या झाल्यास योनीमध्ये जळजळ, अधिक स्त्राव ( discharge ) आणि खाज जाणवू लागते. या संसर्गामुळे योनीमध्ये घट्ट, पांढरे, गंधरहित डिस्चार्ज होऊ लागते आणि शारीरिक संबंध बनवताना किंवा लघवी करताना देखील वेदना किंवा जळजळ होण्याची जाणीव होऊ शकते. या व्यतिरिक्त योनीत सूज आणि लालसरपणा, योनीत दुखणे किंवा प्रायव्हेट पार्टवर लाल पुरळ पडणे ही देखील त्याची लक्षणे आहेत.

हेही वाचा -संगीत थेरेपीमुळे 'या' विकारांपासून मिळू शकतो आराम

Last Updated : Dec 14, 2021, 6:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details