महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

हिवाळ्यात स्टायलिश दिसायचे असेल तर 'हे' आउटफिट्स नक्कीच कॅरी करा

Winter Style Tips : हिवाळ्याच्या मोसमात महिलांना त्यांच्या लूकबद्दल काळजी वाटते. खरं तर, या ऋतूमध्ये स्टायलिश दिसणं थोडं कठीण होऊन बसतं, पण आजकाल हिवाळ्यात घालण्यासाठी अनेक कपडे बाजारात उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत थंडीच्या मोसमात स्टनिंग लूकसाठी तुम्ही कोणते आउटफिट्स ट्राय करू शकता, जाणून घ्या.

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 30, 2023, 4:22 PM IST

Winter Style Tips
हिवाळ्यात स्टायलिश दिसायचेय ?

हैदराबाद : हिवाळ्यात थंडी टाळण्यासाठी उबदार कपडे घालावे लागतात. अशा परिस्थितीत अनेक वेळा मुलींची तक्रार असते की, स्वेटर वगैरे घालून कसं स्टायलिश दिसतील, पण तुम्ही हिवाळ्यातही स्टायलिश दिसू शकता. काही स्टाइलिंग टिप्स आहेत ज्याचे पालन करून तुम्ही हिवाळ्यातही फॅशनेबल दिसू शकता.

  • लांब कोट : जर तुमच्याकडे लांब कोट असेल तर त्यासोबत क्रॉप स्वेटर आणि हायवेस्ट जीन्स घाला. यामुळं तुमचा लुक खूपच आकर्षक होईल. तुम्ही हील किंवा बूट देखील घालू शकता.
  • मिनी स्कर्ट :हिवाळ्यात मिनी स्कर्ट हे नाव ऐकून आश्चर्यचकित होऊ नका. आपण फॅशनेबल पद्धतीनं मिनी स्कर्ट देखील कॅरी करू शकता. टाइट्स आणि लांब बूटांसह थर्मल किंवा नॉर्मल मिनी स्कर्ट घाला. यामुळे तुम्ही स्मार्ट आणि हॉट दिसाल.
  • ओव्हरसाईज स्वेटर :आजकाल ओव्हरसाईज कपड्यांचा ट्रेंड वाढला आहे. लोक स्टाईलपेक्षा आरामाला जास्त महत्त्व देतात, त्यामुळं तुम्ही आरामात स्टायलिश दिसण्यासाठी ओव्हरसाईज टी-शर्ट आणि जीन्स घालू शकता. स्पोर्ट्स शूज सोबत ठेवा.
  • अॅक्सेसरीज : हातमोजे, स्कार्फ आणि टोपी यांसारख्या अॅक्सेसरीज केवळ थंडीपासून तुमचे रक्षण करतील असे नाही तर तुमचा लुक अधिक स्टायलिश बनवतील आणि तुमच्या लूकमध्ये ग्लॅमर वाढवेल.
  • बाइकर जॅकेट : हिवाळ्यात फक्त मुलेच नाही तर मुलीही बाइकर जॅकेट घालू शकतात. तुम्ही पांढऱ्या रंगाचे बाइकर जॅकेट कॅरी करू शकता. याशिवाय तुम्ही स्कार्फही घालू शकता. जीन्स आणि हीलसह बाइकर जॅकेट हे अतिशय हॉट कॉम्बिनेशन आहे.
  • विंटर ड्रेस : यावेळी तुम्ही हिवाळ्यात लाँग ड्रेसही ट्राय करू शकता. लांब बूट किंवा हील एक लांब हिवाळी ड्रेसला शोभादेतात. ड्रेसची लांबी लक्षात घेऊन हील निवडा. यासोबत तुम्ही लांब कोटही कॅरी करू शकता.

ABOUT THE AUTHOR

...view details