हैदराबाद : Winter Health Care हिवाळ्यात संसर्ग होणं ही काही मोठी गोष्ट नाही. हिवाळा सुरू होताच सर्दी, ताप, खोकला, घसादुखी, नाक वाहणं आणि अनेक प्रकारचं इन्फेक्शन होऊ लागतं. यामुळं खूप कफ तयार होतो आणि नंतर छातीत जडपणा येतो. अशा वेळी वेळीच उपचार न मिळाल्यास त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात. थंडीमुळं सर्दी खोकला होतो, असं अनेकदा लोक मानतात. हे पूर्णपणं योग्य नाही. वास्तविक जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपल्या श्वासासोबत धुळीचे कण, बॅक्टेरिया आणि धूर देखील शरीरात प्रवेश करतात. अशा परिस्थितीत आपल्या शरीरात दोन प्रकारची इन्फेक्शन तयार होऊ लागतात. एक धूळ आणि प्रदूषण आणि दुसरा कार्बन डायऑक्साइडपासून तयार होतो.
'या'मुळं जमा होऊ लागतो छातीत कफ, करा 'हे' उपाय - phlegm
Winter Health Care : हिवाळ्यात अनेकदा छातीत कफ जमा होऊ लागतो जो त्रासाचं कारण बनतो. अनेकदा सर्दी खोकला बरा झाल्यानंतरही 'कफ'चा त्रास कायम राहतो. जो आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. अशा परिस्थितीत 'या' खाद्यपदार्थांमुळं तुम्हाला आराम मिळू शकतो.
जमा होऊ लागतो छातीत कफ
Published : Jan 4, 2024, 4:43 PM IST
कफ कसा तयार होतो? - कार्बन डायऑक्साईडपासून तयार झालेला कचरा श्वासाबरोबर बाहेर जातो, परंतु धूळ आणि प्रदूषणातून तयार झालेला कचरा आपल्या फुफ्फुसात जमा होतो आणि जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा हा साचलेला कचरा फुफ्फुसातच सडतो आणि मग त्याचं कफात रूपांतर होतं. या कफाच्या अतिरेकामुळं घशात जळजळ आणि वेदना होतात. अशा परिस्थितीत खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी तुम्ही 'हे' खाद्यपदार्थ खाऊ शकता.
- आल्याचा काढा : आले, गूळ, तुळस आणि काळी मिरी यांचा काढा खूप फायदेशीर आहे. यामुळं घसादुखीपासून आराम मिळतो. तसंच कफ दूर होण्यास मदत होते.
- ओट्स : ओट्समध्ये असलेली प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे तुमची प्रतिकारशक्ती वाढवतात. त्यामुळं सर्दी आणि खोकल्याशी लढण्यासाठी तुमची प्रतिकारशक्ती वाढते. एवढेच नाही तर बीपी नॉर्मल ठेवण्यासही मदत होते.
- दही : हे ऐकून विचित्र वाटेल की थंडी आणि दही, हा कसला प्रकार आहे? पण हे खरं आहे की हिवाळ्यात दही खाणे लहान मुले आणि प्रौढ दोघांसाठीही फायदेशीर असतं. एका संशोधनात असं आढळून आलंय की प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि खनिजं तसंच दह्यामध्ये कूलिंग प्रभाव असतो. ज्यामुळे घशाला आराम मिळतो. तसंच, त्यात असलेले प्रोबायोटिक्स हे आरोग्याचे घटक आहेत.
- मसालेदार गोष्टी खा :मांस, मटण, चिकन किंवा चिकन सूप यांसारख्या गरम मसाल्यांनी बनवलेले पदार्थ सर्दी आणि खोकल्यापासून आराम देतात.
हेही वाचा :