हैदराबाद :आजच्या धावत्या युगाच्या जीवनात आहार नियमनाकडे लक्ष देणे, मोठे आव्हानदायक होत आहे. आजकाल योग्य आहाराचे पालन करणे किंवा जीवनशैली म्हणून स्वीकारणे हा फूड फॅशन ट्रेंड बनत चालला आहे. योग्य आहारामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात, परंतु अनेक वेळा आहाराचे नियोजन न करता पौष्टिकतेची काळजी घेणे आणि त्याचे प्रमाण न ठरवता व काहीही न खाल्ल्याने आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात. शरीराला आवश्यक असलेल्या पोषणापासून वंचित राहावे लागते. हिवाळ्यात खाली दिलेल्या हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा.
1. शेपू : गॅसेस, लहान मुलांची पोटदुखी, जंत, कृमी मुलींमध्ये अनियमित मासिक पाळीसाठी ही भाजी खूप फायदेशीर ठरते. ही भाजी आवर्जून खायला हवी. अनेकदा हार्मोन्सच्या असंतुलनामुळे मासिक पाळीत पोट दुखणे, रक्तस्राव अनियमित असणे असे काही त्रास होऊ लागतात. हिरव्या लहान पानाची ही भाजी शरिरासाठी उपयोगी आहे. मासिक पाळीतला त्रास कमी करण्यासाठी तुम्ही शेपूच्या भाजीचा आहारात समावेश करायला हवा.
2. अंबाडी : अंबाडी भाजी खाण्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. चवीला आंबट लागणाऱ्या या भाजीत व्हिटॅमिन ए आणि खनिज पदार्थ भरपूर असतात. तसेच यामुळे वजन आटोक्यात राहते, डोळ्यांचे आरोग्य सुधारते, हाडे मजबूत होण्यासाठी मदत होते, केसांचे आरोग्य चांगले राहते. प्रतिकारशक्ती वाढून सतत सर्दी, खोकला होणे कमी होते.