महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

अंतवस्त्र न घालता झोपणे का आहे फायदेशीर? - heath issues

झोपताना आपले सर्व कपडे काढून झोपणे ही पाश्चात्य पद्धत समजली जाते आणि बऱ्याच भारतीयांना याची सवयही नाही किंवा या कल्पनेबद्दल त्यांना काही माहितीही नाही. आपण ज्या वातावरणात मोठे होतो तिथे आणि सामाजिक सांस्कृतिक मापदंडात नग्न झोपणे ही खासगी गोष्ट समजली जाते. अगदी एकटे असतानाही असे झोपण्याचा विचार अस्वस्थ करतो. कारण आपण सगळेच मोठ्या कुटुंबात वाढलेले असतो. तिथे खासगी गोष्टींपेक्षा सगळ्यांनी मिळून करायच्या गोष्टींवर भर असतो.

Why sleeping Without Underwear Can Be Beneficial?
सुखीभव

By

Published : Aug 20, 2020, 2:29 PM IST

कपडे घालून झोपायचे किंवा ते काढून झोपायचे ही प्रत्येकाची पसंती असू शकते. आणि या लेखात आम्ही तुम्हाला तज्ज्ञांची मते सांगणार आहोत. अंतवस्त्र काढून झोपण्याचे, अगदी सगळे कपडे काढून झोपण्याचे तुमच्या आरोग्यासाठी भरपूर फायदे आहेत. योनीमार्गाच्या काही समस्या असतील तर अंतवस्त्र न घालता झोपणे उपयुक्त ठरते.

हवा खेळती राहते

तुम्ही झोपेचा प्रयत्न करत असताना कपड्याचा तुकडा योनिमार्गावर दाबून ठेवणे खूप त्रासदायक वाटू शकते. शिवाय फॅब्रिकच्या अंतवस्त्रामुळे तुमची योनी मोकळा श्वास घेऊ शकत नाही. तिच्यातला ओलावा तसाच राहतो. योनीमार्ग स्वच्छ राहण्यासाठी सतत द्रव स्रवत असते. त्यामुळे अंतवस्त्र दिवसभर ओलसर राहते. त्यामुळे योनीला हवा मिळण्यासाठी मोकळे ठेवलेत तर ओलावा राहणार नाही आणि त्यामुळे होणारा संसर्गही टळेल. न्यूयॉर्क शहरातील रहिवासी असलेल्या एमडी कमिला फिलिप्स म्हणता, 'अंतवस्त्रापासून द्रव आणि योनीला काही काळ वेगळा वेळ घालवू द्या.'

तुम्ही जलद आणि चांगले झोपू शकता

तुमच्या झोपेत मोठा हातभार असतो तो तुमच्या शरीराच्या तापमानाचा. नॅशनल सेंटर ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन्फर्मेशन (एनसीबीआय) च्या २०१२ च्या अभ्यासाप्रमाणे तुमच्या शरीराला उष्णता जाणवली तर मग तुम्हाला झोप लागत नाही. तुमची झोपमोड होते. अंतवस्त्र काढून झोपलात तर शरीर थंड राहते आणि झोप लवकर येते. झोप येण्यासाठी शरीराचे तापमान ६०-६५ डिगरी हवे. पण ते नेहमी असतेच असे नाही. विशेष करून उन्हाळ्यात. म्हणूनच झोपताना अंतवस्त्र काढून, शक्य असेल तर पूर्ण नग्नच झोपावे. ते आरोग्यासाठी योग्य आहे.

योनीला संसर्ग होण्याचा धोका कमी होतो

आपण अनेकदा घट्ट अंतवस्त्र किंवा ट्राउझर घालतो. त्यामुळे हवा आत येत नाही. तुमचे खासगी अवयव उष्ण आणि दमट राहतात. तज्ज्ञांचे म्हणणे असे की याहीमुळे योनीमार्गात जंतू वाढतात आणि संसर्ग होतो.

या भागात हवा खेळती राहिली की ओलावा राहत नाही, मग संसर्गही होत नाही, त्वचा जळजळही होत नाही, 'लैंगिक आरोग्य तज्ज्ञ सिंडी बारशॉप सांगतात. तुम्हाला नग्न झोपणे अवघड वाटत असेल तर तुम्ही सैलसर पायजमा किंवा स्कर्ट घालू शकाल. यामुळे तुमची योनी मोकळा श्वास घेऊ शकेल.'

अ‍ॅलर्जीचा धोका कमी होतो

रात्री तुमची योनी तुमच्या अंतवस्त्र धुण्यासाठी वापरण्यात आलेल्या रासायनिक साबणाच्या संपर्कात नसण्याची हीच वेळ असू शकते. कमिला फिलिप्स सांगतात, तुम्ही तुमची अंतवस्त्र बाजूला ठेवणे हे तुमच्या योनीसाठी आरोग्यदायी आहे. अनेकदा अंतवस्त्र धुताना वापरलेल्या साबणातली रसायने धुण्यानंतरही तिथे राहू शकतात. त्यामुळे त्वचेवर पुरळ, अ‍ॅलर्जी आणि इतर काही त्रास होऊ शकतो.

ABOUT THE AUTHOR

...view details