हैदराबाद :तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आपल्याला जिथे अनेक फायदे झाले आहेत, तिथे तोटेही आहेत. पण आज आपण यातून होणारे नुकसान, सेलफोनमध्ये गुंतून राहण्याच्या सवयीमुळे नातेसंबंधांवर कसा परिणाम होतो याबद्दल बोलणार आहोत. काहीजण शेजारी बसूनही बोलणे ऐकण्याऐवजी इअरफोन लाऊन सेलफोनमध्ये पाहत असतात. मित्र आणि नातेवाईकांमध्ये ही सवय कधीतरी सहन केली जाऊ शकते, परंतु तुमची ही सवय नात्यांमध्ये दुरावा आणण्याचे कारण ठरु शकते. नात्यांना हानी पोहोचवणाऱ्या मोबाईल फोनमुळे तयार होत असलेल्या नवीन सवयींपैकी एक म्हणजे 'फबिंग'. जे कोणतेही नाते अक्षरशः संपवू शकते. या 'फबिंग'बद्दल नेमके जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
'फबिंग'मुळे नातेसंबंधात दुरावा : कोणतेही नाते आणि त्यात येणारी गुंतागुंत यांची व्याख्या करण्यासाठी आपल्याकडे अनेक शब्द आहेत. जसा लाल ध्वज, हिरवा ध्वज! त्याचप्रमाणे, फबिंग ही देखील एक संज्ञा आहे, जी दोन शब्द जोडून बनविली जाते- फोन + स्नबिंग. म्हणजेच फोनला चिकटून राहिल्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे दुर्लक्ष करता तेव्हा त्याला 'फबिंग' म्हणतात. 'फबिंग'मुळे नातेसंबंधात दुरावा निर्माण होऊ शकतो.
'फबिंग' म्हणजे काय?अन्न, वस्त्र, निवारा यांसह सेलफोन आणि ओघाने येणारा सोशल मीडिया म्हणजे माणसाची मूलभूत गरज झाली आहे की काय, असे वाटण्याजोगी सध्याची परिस्थिती आहे. आपल्या सेलफोनपासून किंवा सोशल मीडियावाचून आपण जगूच शकत नाही, जणू असेच अनेकांना वाटायला लागले आहे. अर्थात कधी कधी हे नकळत घडत असते. काही जण एकीकडे कुणाशी तरी बोलत असतात, लक्ष मात्र सेलफोनच्या स्क्रीनकडे असते. थोडक्यात त्यांच्या लेखी समोरच्याशी संभाषणापेक्षा सेलफोन जास्त महत्त्वाचा असतो. फोन वारंवार तपासणे किंवा सोशल मीडियावरून स्क्रोल करणे हे एक व्यसन आहे. यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मेंदूत तुमच्याबद्दल वेगळी प्रतिमा तयार होते. जेव्हा लोक त्यांच्या फोनमध्ये व्यग्र असतात आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांकडे लक्ष देत नाहीत तेव्हा जे होतो, त्याला म्हणतात 'फबिंग'! असे वागणाऱ्याच्या स्वभावाचा अनादर केला जाऊ शकतो. याचे नातेसंबंधावर वाईट पडसाद पडू शकतात.
'फबिंग' या मार्गांनी नातेसंबंधांना हानी पोहोचवते