महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 18, 2022, 12:40 PM IST

ETV Bharat / sukhibhava

Ear fungal infection कानाला बुर्शीचा संसर्ग होऊ नये यासाठी ही खबरदारी घ्या

पावसाळ्यात कानाला बुरशीचे संक्रमन देखील होण्याची What causes ear fungal infection शक्यता असते. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास कानाला मोठी इजा देखील होण्याची fungal infection in monsoon शक्यता असते. काय आहे हा आजार आणि त्यापासून बचावासाठी काय करावे याबाबत इंदूर येथील ईएनटी सेंटरचे कान, नाक आणि घसा रोग तज्ज्ञ सुबीर जैन यांनी ईटीव्ही भारतला माहिती दिली.

What causes ear fungal infection
कानाचा फंगल इन्फेक्शन

पावसाळ्यात जंतू आणि विषाणूजन्य रोग डोके वर काढतात. त्यामुळे, या मोसमात आरोग्याची What causes ear fungal infection काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषत: कान, नाक, घशा संबंधी आजार या काळात आढळतात. सर्दी, खोकला, त्वचा रोग यासह कानात संसर्ग fungal infection in monsoon झाल्याचे अनेक प्रकार पुढे येतात. पावसाळ्यात कानाला बुरशीचे संसर्ग देखील होण्याची शक्यता असते. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास कानाला मोठी इजा देखील होण्याची शक्यता असते. काय आहे हा आजार आणि त्यापासून बचावासाठी काय करावे याबाबत इंदूर येथील ईएनटी सेंटरचे कान, नाक आणि घसा रोग तज्ज्ञ सुबीर जैन यांनी ईटीव्ही भारतला माहिती दिली.

हेही वाचाCheat Meals Associated with Eating Disorders संशोधकांना चीट मील्स खाण्याच्या विकारांशी जोडलेले आढळले


पावसाळ्यात कानात बुरशीजन्य संसर्ग होण्याची समस्या सामान्य आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्याने किंवा योग्य उपचार न मिळाल्याने कानाच्या पडद्यावर कायमस्वरुपी परिणाम होण्यासह इतर अनेक समस्या उद्भवू शकतात, अशी माहिती डॉ. सुबीर यांनी ईटीव्ही भारतला दिली.


कानात बुरशीजन्य संसर्गपावसाळ्यात कानाशी संबंधित समस्यांबद्दल ईटीव्ही भारत सुखीभवला अधिक माहिती देताना डॉ. सुबीर जैन सांगतात की, पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता खूप वाढते. जे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे कानात बुरशीजन्य संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढवते. या हंगामात होणाऱ्या कानाच्या संसर्गामध्ये ऑटोमायकोसिस संसर्ग सामान्य आहे. ज्यासाठी दोन कारणे जबाबदार मानली जातात.

कॅन्डिडा Candida

एस्पर्जिलस Aspergillus

यात कॅन्डिडामध्ये कानातून पांढरा पससारखा पदार्थ किंवा फ्लेक्स निघतो. तेच एस्पर्जिलसमध्ये कानातून रक्तासारखा पदार्थ किंवा द्रव्य निघतो.

सेरुमेन Cerumen देखील वाढवतो समस्याडॉ सुबीर जैन स्पष्ट करतात की काही वेळा इअरवॅक्स किंवा कानातील मळ, ज्याला सेरुमेन असेही म्हणतात, कानाच्या संसर्गासाठी किंवा समस्यांसाठी जबाबदार असू शकतो. आपल्या कानात असलेल्या ग्रंथींमध्ये सेरुमेन तयार होते आणि त्याचे स्वरूप वेगवेगळ्या व्यक्तींच्या कानात भिन्न असू शकते. काही लोकांच्या कानात ते पातळ अवस्थेत राहते. काहींच्या कानात ते किंचित कडक तर काहींच्या कानात ते जास्त कोरडे आणि कडक असते. सेरुमेन कानांसाठी नैसर्गिक संरक्षण म्हणून काम करते आणि बाहेरील धूळ आणि बॅक्टेरिया कानाच्या आतील भागात जाण्यापासून प्रतिबंधित करते. परंतु, पावसाळ्यात जेव्हा वातावरणातील आर्द्रता वाढते तेव्हा ते अनेकवेळा ओलावा शोषून घेते आणि फुगते. त्यामुळे कानाच्या नळीत अडथळा निर्माण होतो. यामुळे अनेक वेळा कान बंद होणे आणि दुखणे किंवा खाज येणे किंवा इन्फेक्शन होण्याची शक्यताही वाढते.

ईयर बडही सुरक्षित नाहीअनेक वेळा लोक केसांचा चिमटा, माचिस आणि इतर गोष्टींनी कानातले मळ साफ करतात. केसांच्या चिमट्यांच्या वापरामुळे कानाच्या आतील त्वचेला, अगदी कानाच्या पडद्यालाही इजा होऊ शकते. तर मॅचस्टिकवरील मसाला कानात गेल्यावर ओलाव्यामुळे बुरशी होऊ शकते, जे केवळ संसर्गाचेच कारणच नव्हे तर कानात आधीच इन्फेक्शन असेल तर ते अधिक गंभीर बनवू शकते. इअर बड हा देखील कान स्वच्छ करण्याचा सुरक्षित मार्ग नाही. कारण याचा वापर केल्याने बहुतेकदा कानातले मळ बाहेर येण्याऐवजी कानात जाते. जे काही केवळ इन्फेक्शनच नव्हे तर कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण करू शकते. कानाच्या पडद्यालाही नुकसान पोहोचवू शकते, असे डॉ. सुबीर जैन म्हणाले.

खबरदारी आवश्यकआपल्या शरीराची रचना अशा प्रकारची आहे ज्यात शरीरातील जवळजवळ सर्व अंतर्गत अवयवांची स्वच्छता ही आपोआप होते. तसेच कानात जास्त मळ असल्यास तो आपोआप कानातून बाहेर पडतो. परंतु काही कारणास्तव हे शक्य नसेल तर कानाला इजा होईल अशा वस्तूंचा अजिबात वापर करू नये. जर कान स्वच्छ करण्यासाठी इअर बड वापरायचेच असेल तर साफसफाई करताना बडच्या एकूण लांबीच्या केवळ 20 टक्के भाग कानात टाकावा.


शक्यतो कान स्वच्छ करण्यासाठी डॉक्टरांची मदत घेणे हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. याशिवाय कानांना इन्फेक्शन किंवा दुखापत होण्यापासून वाचवण्यासाठी इतर काही गोष्टींचीही काळजी घेतली जाऊ शकते, जसे की कानाला कधीही जास्त घासून किंवा हलवून स्वच्छ करू नये. असे केल्याने कानाची त्वचा कापण्याचा किंवा दुखापत होण्याचा धोका वाढतो. आणि कधीकधी या दुखापतीमुळे संसर्ग देखील होऊ शकतो. याशिवाय नदी किंवा स्विमिंग पूलमध्ये पोहताना नेहमी इअर प्लगचा वापर करावा जेणेकरून कानात पाणी जाऊ नये. कारण काही वेळा दूषित पाणी देखील कानाच्या संसर्गास कारणीभूत ठरू शकत, असा सल्ला डॉ. सुबीर जैन यांनी दिला.

स्वत: औषधोपचार करण्याऐवजी डॉक्टरांना दाखवावे कानात दुखणे, कान बंद झाल्याचे वाटणे किंवा सतत शिट्टी वाजणे, कानात टोचल्या सारखे वाटणे किंवा सूज येणे, जळजळ होणे, वेदना होणे आणि कानात पू होणे यासह कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास स्वत: औषधोपचार करण्याऐवजी ईएनटी तज्ञाशी संपर्क साधणे खूप महत्वाचे आहे. यासोबतच डॉक्टरांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि औषधांचे पूर्णपणे पालन करणे आवश्यक आहे, असा सल्लाही डॉ. सुबीर जैन यांनी दिला.

हेही वाचाMonkeypox Care Globally Study उपचार मार्गदर्शक तत्त्वांचा अभाव जागतिक स्तरावर मंकीपॉक्सच्या काळजीमध्ये आणतोय अडथळा

ABOUT THE AUTHOR

...view details