तणाव शरीराचा असो किंवा मनाचा, दोन्ही त्रास देतात. अशात बॉडी मसाज किंवा स्पा शरीराचे तणाव दूर करण्याबरोबरच मन शांत करण्यातही मदत करते.
धावळपळीचा, तणाव असलेल्या दिनक्रमाचा परिणाम सामान्यत: लोकांच्या शरीरावर दिसून येतो. जसा, थकवा, तणाव, चिडचिडेपणा आणि त्वचेच्या समस्या इत्यादी. अशा स्थितीत छान आरामदायक बॉडी मसाज किंवा बॉडी स्पा शरीर आणि मन दोघांवरही चमत्कारिक परिणाम करू शकते. मात्र, सामान्यत: लोकांमध्ये स्पा किंवा सलूनमध्ये जावून बॉडी मसाज करण्याविषयी खूप गोंधळ दिसून येतो, कारण न त्यांना त्यांच्या फायद्यांविषयी जास्त माहिती आहे, ना त्यांच्या प्रक्रियेबद्दल.
बॉडी स्पा किंवा बॉडी मसाज कशा प्रकारे आपल्या शरीराला आणि मनाला फायदा पोहोचवते, याबाबत 'ईटीव्ही भारत सुखीभव'ने सौंदर्य तज्ज्ञ आणि जैविक वेलनेसच्या फाउंडर आणि सीईओ नंदिता शर्मा यांच्याकडून माहिती घेतली.
बॉडी स्पा किंवा बॉडी मसाजचे फायदे
नंदिता सांगतात की, नियमित अंतराने बॉडी स्पा किंवा बॉडी मसाज आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला फायदा पोहोचवतो. बॉडी स्पा एक उपचार पद्धती (therapy) आहे. ज्यात फक्त मालिशच नव्हे, तर अनेक इतर उपचारांच्या मदतीने शरीर आणि मनाला आराम देण्याचा प्रयत्न केला जातो. या उपचार पद्धतीत सुगंधित तेल किंवा क्रीमच्या मसाज व्यतिरिक्त शरीराची स्क्रबिंग आणि पॉलिशिंग देखील केली जाते. ज्यामुळे शरीरात रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होते आणि स्किन सेल्सना अधिक ऑक्सिजन आणि पोषक तत्व मिळतात.
बॉडी स्पा नंतर शरीराच्या स्नायूंमध्ये निर्माण झालेल्या तणावापासून देखील आराम मिळते आणि शरीराचा थकवा दूर होतो. याच कारणामुळे बहुतांश लोक मालिशदरम्यान झोपी जातात. बॉडी स्पामुळे पेन मॅनेजमेंटमध्ये देखील फायदा मिळतो. बहुतांश लोकांना स्पा नंतर शरीराच्या कुठल्याही भागात होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो. त्वचेवरही याचा चांगला परिणाम होतो. चांगल्या उत्पादनासोबत होणारी चांगली मालिश त्वचेत कोलोजन वाढवते, ज्याने त्वचेवर वयाचा प्रभाव तर कमी होतोच, त्याचबरोबर इतर अनेक त्वचेसंबंधी समस्यांपासून आराम मिळते. जसे त्वचेवर तीव्र सूर्यप्रकाशाचा प्रभाव म्हणजेच सनबर्न, मुरुमे किंवा दाने आणि फ्रेकल्स (Freckles).
स्पादरम्यान शरीराच्या त्वचेला एक्सफोलिएट देखील केले जाते, ज्यासाठी सी सॉल्ट, अनेक प्रकारचे औषधीयुक्त आणि सुंगंधित तेल किंवा क्रीमचा वापर केला जातो. याने त्वचेच्या मृत पेशी निघून जाते आणि त्वचा स्वच्छ आणि मऊ होते. याव्यतिरिक्त बॉडी स्पा आणि बॉडी मसाजचे काही अन्य फायदे पुढील प्रमाणे आहे,
- बॉडी मसाज किंवा स्पाने स्ट्रेस हार्मोन कमी होतात.
- त्वचे संबंधी समस्यांपासून आराम मिळतो.
- मेंदूची चपळता वाढते आणि तणाव व चिंता कमी होते.