महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Skin Care : चेहऱ्यावर तेज हवे ? मग स्वतःच्या हातांनी बनवा 'असा' पपई फेसपॅक - glow on your face

साधारणपणे, स्त्रिया जेव्हाही ब्युटी पार्लरमध्ये जातात तेव्हा पपई क्लीनअप आणि पपई फेशियलचा (glow on your face) पर्याय निवडतात. ते कृत्रिम क्रीम आणि रसायनांपासून बनवले जातात. त्यामुळे चेहराही खराब होऊ शकतो. त्यामुळे पपईचा फेस पॅक घरीच तयार करून वापरलात तर तुमच्या स्किनसाठी (Benefits of Papaya) बरे होईल. चला तर जाणून घेवूया पपई फेसपॅक (Papaya face pack) बनवण्याची पद्धत. (How to make papaya face pack)

papaya face pack
पपई फेसपॅक

By

Published : Dec 26, 2022, 5:21 PM IST

हैदराबाद :पपई केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर आपल्या सौंदर्यासाठीही (Papaya face pack) वरदान आहे. पपईमुळे वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यासह आपल्या त्वचेला अनेक लाभ मिळतात. तज्ज्ञांच्या मते, पपई हे त्वचेसाठी सुपरफूड मानले जाते. निरोगी राहण्यासाठी हा एक चांगला पर्याय तर आहेच, शिवाय, चमकदार त्वचेसाठीही फायदेशीर आहे. होममेड फेस पॅक त्वचेशी संबंधित अनेक समस्यांवर मात करण्यास मदत करतात. याशिवाय, पपईचे फेस पॅक आपल्याला त्वचा उजळ करण्यास, ती चमकण्यास, मुरुमांवर उपचार करण्यास आणि सन टॅन दूर करण्यास मदत करू शकतात. पपईचा फेस पॅक बनवणे खूप सोपे आहे. पपई हे फळ प्रत्येकाच्या घरामध्ये सहजरित्या आढळते. या फळापासून आपल्याला आरोग्यवर्धक तसंच सौंदर्यवर्धक देखील लाभ मिळतात. पपईतील औषधी गुणधर्मांमुळे त्वचेला खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. (Benefits of Papaya)

पपई फेसपॅक बनवण्याची पद्धत (How to make papaya face pack) :

  • तज्ज्ञांच्या मते, त्वचेची टॅनिंग दूर करण्यासाठी पपईची पेस्ट बनवा. नंतर त्यात ऑलिव्ह ऑईल आणि लिंबूचे काही थेंब टाका. यासोबतच त्यात चिमूटभर हळद टाका. नंतर हे मिश्रण चांगले मिसळा. हा फेस पॅक तुमचे टॅनिंग दूर करेल.
  • त्वचा घट्ट करण्यासाठी तुम्ही अंडी देखील वापरू शकता. यासाठी तुम्हाला 5-6 पपईचे तुकडे आणि 1 फेटलेल्या अंड्याचा पांढरा भाग लागेल. पपईचे तुकडे मिसळा. त्यात अंड्याचा पांढरा भाग घाला. हे मिश्रण मानेवर आणि चेहऱ्यावर लावा. 15 ते 20 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर पाण्याने धुवा. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून एकदा वापरू शकता.
  • आठवड्यात दोन ते तीन दिवसांनंतर पपईचा फेस पॅक लावल्यास चेहरा चमकदार दिसेल. पिकलेल्या पपईचा गर घ्या आणि मॅश करा. यामध्ये तीन चमचे मध आणि एक चमचा मुलतानी मिक्स करा. हे फेस पॅक मान आणि चेहऱ्यावर लावा. हलक्या हातानं मसाज करा आणि 15-20 मिनिटांसाठी लेप लावून ठेवा. लेप सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या.
  • तुमच्या घरात केळी असेल तर त्यात पपईच्या पल्पमध्ये मिसळा. दोघांनाही चांगले मॅश करून फेटा. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

ABOUT THE AUTHOR

...view details