महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Tips for Healthy Life : निरोगी जीवन हवे? मग वाचा हे 4 आरोग्यंमंत्र

निरोगी जीवन (Healthy Life) जगण्यासाठी या लेखामध्ये आपण निरोगी जीवन जगण्यासाठी टिप्स (Tips for Healthy Life) पाहणार आहोत. आपल्या सर्वांनाच आपले आयुष्य आनंदी असावे असे वाटते. पण आयुष्यात मिळणाऱ्या आनंदाचा उपभोग घेण्यासाठी आपले शरीर निरोगी असणे आवश्यक आहे. योग्य आहार आणि काही सवयी बदलून आपण एक आरोयग्यदायी जीवन जगू शकतो.

By

Published : Nov 2, 2022, 5:14 PM IST

Healthy Life
निरोगी जीवन

निरोगी जीवन (Healthy Life) जगण्यासाठी या लेखामध्ये आपण निरोगी जीवन जगण्यासाठी टिप्स (Tips for Healthy Life) पाहणार आहोत. आपल्या सर्वांनाच आपले आयुष्य आनंदी असावे असे वाटते. पण आयुष्यात मिळणाऱ्या आनंदाचा उपभोग घेण्यासाठी आपले शरीर निरोगी असणे आवश्यक आहे. आपले आरोग्य हे खानपान आणि काही दैनंदिन सवयींवर अबलंबून असते पण आपण त्याबद्दल हवे तेवढे गंभीर नसतो. योग्य आहार आणि काही सवयी बदलून आपण एक आरोयग्यदायी जीवन जगू शकतो.

या हेल्थ टिप्स तुमचे आयुष्य कसे आरोग्यदायी बनवतील? :या हेल्थ टिप्स खूप छोट्या पण खूप परिणामकारक आहेत. या टिप्स एवढ्या सोप्या आहेत की, तुम्ही त्या आजपासून सुरु करू शकता आणि काही दिवसानंतर तुम्हाला तुमच्या आरोग्यामध्ये सकारात्मक परिणाम दिसून येईल. यासाठी तुम्हाला कोणताही हेल्थ प्रॉडक्ट विकत घेण्याची गरज नाही, फक्त तुमच्या काही सवयी बदलण्याची गरज आहे.

1. दररोज पौष्टीक नाश्ता घ्या: (Have a healthy breakfast)आपण प्रत्येकाने दिवसाची सुरुवात नाश्ताने करावी. आपल्या शरीरामध्ये सकाळी उर्जेची पातळी कमी होते कारण आपण किमान 10 तासांपूर्वी आपले शेवटचे भोजन केले असते. सकाळी आपल्या शरीरात ग्लूकोजचे प्रमाण खूप कमी असते. तर, ग्लूकोज आणि उर्जा पातळीला चालना देण्यासाठी आपण दररोज नाश्ता घेतला पाहिजे. नाश्त्यामध्ये पौष्टिक अन्नपदार्थ घ्यावेत. नाश्त्यामध्ये प्रथिने आणि जीवनसत्त्वे असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही फळे, रस, दूध आणि कोरडे फळ घेऊ शकता. आपण कांदेपोहे, उपमा, शिरा यासारंखे पदार्थही घेणे खूप फायद्याचे आहे.

2. पुरेसे पाणी प्या:(Take good water intake)आपल्या शरीरामध्ये पाणी ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आपल्या शरीराच्या वजनातील 60 टक्के हे पाणी असते. पाण्याचा उपयोग हा शरीराचे तापमान योग्य ठेवणे, पचन आणि शरीरातील निरोगपयोगी घटक बाहेर टाकणे यासारख्या कामांमध्ये होतो. एखादी व्यक्ती अन्नाशिवाय अनेक आठवडे जगू शकते, परंतु पाण्याशिवाय काही दिवस जगू शकते.

3. फास्ट फूड खाणे टाळा:(avoid junk food)बर्‍याच लोकांना फास्ट फूड खाण्याची सवय असते. परंतु फास्ट फूड तुमच्या आरोग्यासाठी चांगला नाही. फास्ट फूडमध्ये कॅलरी, चरबी, सोडियम आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते म्हणून जास्त फास्ट फूड खाल्ल्याने उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि ऐकण्याच्या आजारासारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. बाहेर फिरताना चटकदार आणि चविस्ट वडापाव सारखे पदार्थ पाहून आपण ते खाऊन आपला पोटोबा शांत करतो. कधीतरी फक्त चवीसाठी असे पदार्थ खाल्ले तर चालेल पण सतत हे पदार्थ खाऊन आपण आरोग्याच्या अनेक समस्यांना निमंत्रण देतो. आपल्या मनावर थोडासा ताबा ठेऊन आपण फास्ट फूड खाणे टाळू शकतो.

4. फळांचा समावेश करावा:(Include fruits)आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा पालेभाज्यांचा आणि फळांचा समावेश करावा. या पालेभाज्या आणि फळांमध्ये विविधप्रकारची पोषकतत्त्वे, खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. त्यामुळे हा आहार आपल्या शरीराची पोषकतत्त्वे, जीवनसत्त्वे यांसारख्या घटकांची गरज भागवतो. या आहारामध्ये चरबी, साखर आणि कोलेस्ट्रॉल यांचे प्रमाण खूपच कमी असते, त्यामुळे उच्च रक्तदाब आणि वजन वाढण्यासारख्या समस्यांपासून आपण दूर राहू शकतो.

ABOUT THE AUTHOR

...view details