जसे प्रेमात पडलेल्या माणसात अनेक बदल दिसू लागतात, तसेच ब्रेकअप झालेल्या व्यक्तीमध्येही मोठ्या प्रमाणात बदल घडून येतो. कधी सकारात्मक बदल होतात तर कधी नकारात्मक बदल होतात. अनेकांना ब्रेकअप झाल्यावर आयुष्य थांबल्या सारखे वाटू लागते. जेव्हा आपण आपल्या पार्टनरसोबत असतो तेव्हा आयुष्य खूप सुंदर वाटायला लागते. पण जर काही कारणास्तव नाते तुटले तर आयुष्याचे सगळेच गणित बिघडल्यासारखे वाटते. जर कधी नात्याबद्दल निराशा वाटली तर घाबरण्याऐवजी पुढे जायचा विचार करावा.
आत्मविश्वासाने पुढे जावे:आपल्या नात्यातील कटू आठवणी विसरून पुढे जाण्यातच शहाणपण आहे, तरच तुम्ही आत्मविश्वासाने आयुष्य जगू शकाल. सर्वात आधी, तुमचे ब्रेकअप झाले आहे, हे स्वीकारा आणि दोघांचे मार्ग आता वेगळे झाले आहेत हे देखील स्वीकारा. तुमच्या मनात कोणते गिल्ट असेल तर ते काढून टाका आणि या गोष्टी लक्षात ठेवा.
अपयश वाटू शकते: आपण प्रेमात काही उगाच पडत नाही. एखादा माणूस आपल्या मनाच्या खूप जवळ येतो. आपल्या सहवासात सतत असतो. आपणही त्याला मनातले सगळ सांगतो, पण अचानक जेव्हा छोट्याश्या कारणाने ते नाते तुटते, तेव्हा आपण निराश होतो आणि आपल्याला हे खूप मोठे अपयश वाटू शकते.