महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Vitamin E capsules for hair : केसांच्या चांगल्या वाढीसाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूल फायदेशीर; जाणून घ्या फायदे आणि वापराच्या पद्धती - मुळांपासून मजबूत

Vitamin E capsules for hair : व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर केसांसाठी खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर केसांसाठी अनेक प्रकारे करता येतो. केसांचा रंग सुधारण्यासोबतच ते मुळांपासून मजबूतही होतात. तसंच केस गळणेही कमी होतात. जाणून घ्या व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे फायदे...

Vitamin E capsules for hair
व्हिटॅमिन ई कॅप्सूल

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 8, 2023, 2:39 PM IST

हैदराबाद : Vitamin E capsules for hair व्हिटॅमिन ई कॅप्सूल केसांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. व्हिटॅमिन ईमध्ये 8 प्रकारचे फॅट्स असतात, जे अँटिऑक्सिडंट्सनी समृद्ध आहेत. यामुळे केसांचा रंग सुधारतो आणि केस गळणे थांबते. पण केसांसाठी त्याचा वापर कसा करणार हे जाणून घ्या.

केसांसाठी व्हिटॅमिन ई कसे वापरावे :

  • खोबरेल तेलात व्हिटॅमिन ई मिसळा : जर तुमचे केस पातळ असतील तर दररोज व्हिटॅमिन ई कॅप्सूल खोबरेल तेलात मिसळून लावा. व्हिटॅमिन ईमध्ये अल्फा-टोकोफेरॉल नावाचं रसायन असतं जे टाळूमध्ये रक्त संचरण सुधारण्यास मदत करतं. हे पीएच पातळी, सीबम आणि केसांच्या कूपांचे पोषण करते, ज्यामुळे तुमची टाळू निरोगी राहते.
  • ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई मिसळा : जाड आणि निरोगी केसांसाठी हेल्दी स्कॅल्प असणं खूप गरजेचं आहे. यासाठी ऑलिव्ह ऑईलमध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळून केसांना लावा. तुमच्या शेंड्याला दुतोंडी असलेल्या (स्ल्पीटएंड) केसांसाठी हे फायदेशीर आहे. यामुळे केसांना पोषण मिळते आणि केस निरोगी होतात.
  • अंड्यामध्ये व्हिटॅमिन ई मिसळा :कोंड्यामुळे अनेकजण त्रस्त असतात. डोक्यातील कोंड्यामुळे टाळूला खाज सुटते. अंड्याचे मिश्रणात व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करून ते लावल्याने कोंडा तर नियंत्रित येतोच पण टाळूला मॉइश्चरायझेशनही होते.
  • टी ट्री ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई मिसळून लावा : डोक्यातील कोंड्यावर उपचार करण्यासाठी तुम्ही टी ट्री ऑइल आणि व्हिटॅमिन ई हेअर मास्क आठवड्यातून दोनदा वापरू शकता. यासाठी एक चमचे खोबरेल तेल, 2 चमचे व्हिटॅमिन ई आणि 1 चमचे टी ट्री ऑइल मिक्स करा. हे मिश्रण केसांना लावा, साधारण २-३ तास ​​राहू द्या आणि नंतर केस धुवा. आठवड्यातून दोनदा हे केल्याने कोंडा कायमचा दूर होईल.
  • एलोवेरा जेलमध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळून लावा :निस्तेज केसांना चमक आणण्यासाठी तुम्ही एलोवेरा जेलमध्ये व्हिटॅमिन ई मिसळून लावू शकता. हे तुमच्या केसांना आधी मॉइश्चर करते. व्हिटॅमिन ई तेलाची नियमित मसाज केल्याने तुमच्या केसांचे पोषण होते. निस्तेज आणि निर्जीव केसांना आर्द्रता मिळते. यामुळे तुमचे केस चमकतात.

हेही वाचा :

  1. Pineapple Benefits And Side Effects : रोगप्रतिकार शक्ती वाढवते अननस; जाणून घ्या फायदे आणि तोटे
  2. Turbinate Hypertrophy : का उद्भवतात नाकाच्या हाडांच्या वाढीच्या समस्या; जाणून घ्या कारणे आणि परिणाम...
  3. Health Benefits of Dates : तणावामुक्तीपासून पचनक्रिया निरोगी ठेवण्यापर्यंत, जाणून घ्या खजूर खाण्याचे आश्चर्यकारक फायदे...

ABOUT THE AUTHOR

...view details