मुंबई : प्रेम हा एक असा शब्द आहे, ज्याचे नाव घेताच वातावरण आल्हाददायक होते. प्रेमाची भावना मोठ्यात मोठी समस्या क्षणार्धात सोडवू शकते. हीर-रांझा, लैला-मजनू आणि असे किती प्रेमात पडले आणि किती उध्वस्त झाले, पण प्रेम सदैव जिवंत आहे. अशा परिस्थितीत प्रेमाचा सण म्हणा किंवा ऋतू म्हणा, सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे आणि आज १४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाइन डे आहे. आज आम्ही काही सेलिब्रिटींच्या प्रेमकथा घेऊन आलो आहोत, ज्या वाचल्यानंतर तुम्हीही स्वत:ला प्रेमात पडण्यापासून रोखू शकणार नाही.
विक्रम बत्रा-डिंपल :कॅप्टन विक्रम बत्रा यांनी देशासाठी दिलेलले बलिदान कोण विसरू शकेल? एकवीस वर्षांपूर्वी 7 जुलै रोजी पाकिस्तानी लष्कराने त्यांना शेरशाह ही पदवी देऊन गौरवले होते. कारगिल वीर विक्रम बत्रा यांनी आपल्या साथिदाराचे प्राण वाचवताना स्वत:चा जीव दिला. त्यांच्या धैर्यामुळे आणि आत्मत्यागामुळे सैनिकांना प्रेरणा मिळाली. या धाडसी जवानाची प्रेमकथाही तेवढीच सुंदर आहे. त्याची डिंपलशी 1995 मध्ये पंजाब विद्यापीठात भेट झाली. 1999 मध्ये युद्ध सुरू होण्यापूर्वी दोघे इंग्रजीमध्ये एमए पदवीचे शिक्षण घेत होते, जिथे त्यांची मैत्री प्रेमात फुलली. 1996 मध्ये, विक्रम बत्राची इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये निवड झाली आणि त्यांना डेहराडूनला जावे लागले. त्यांची मैत्रीण डिंपल चीमा हिला भीती होती की दुराव्यामुळे त्यांच्या नात्यात तडजोड होईल, पण बत्रा यांनी तिला लवकरच लग्न करणार असल्याचे वचन दिले. त्यांच्यावर चित्रित झालेल्या शेरशाह या चित्रपटात विक्रम ब्लेडने बोट कापून डिंपलचे कपाळ भरतो असे दाखविले आहे. मात्र दुर्दैवाने कॅप्टन विक्रम बत्रा यांनी 7 जुलै 1999 रोजी डिंपलला मागे सोडत जगाचा निरोप घेतला.
दिलीप कुमार-सायरा बानो :चित्रपट जगतातील प्रसिद्ध स्टार मोहम्मद युसूफ खान यांनी 1944 मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले तेव्हा त्यांना दिलीप कुमार हे नाव मिळाले. सायरा बानो त्यांच्यापेक्षा 22 वर्षांनी लहान होत्या. त्या दिलीप कुमारच्या खूप मोठ्या चाहत्या होत्या. 11 ऑक्टोबर 1966 रोजी दिलीप कुमार आणि सायरा बानो यांचा विवाह झाला तेव्हा सायरा बानो 22 वर्षांच्या होत्या, तर दिलीप कुमार 44 वर्षांचे होते. दिलीप कुमार आणि सायरा बानो आयुष्यभर एकत्र राहिले. विशेष म्हणजे त्यांचे वय त्यांच्या प्रेमाच्या आड कधीच आले नाही.
सचिन तेंडुलकर-अंजली :क्रिकेटचा देव म्हटला जाणाऱ्या सचिनला कोणत्याही परिचयाची गरज नाही. तर आज आम्ही तुम्हाला त्याच्या प्रेमकथेची ओळख करून देत आहोत. अंजली तेंडुलकर ही लोकप्रिय उद्योगपती अशोक मेहता यांची मुलगी आहे. मात्र, जेव्हा त्यांचे लग्न झाले तेव्हा त्यांच्याबद्दल कोणालाच काही माहीत नव्हते. सचिन आणि अंजलीची पहिली भेट मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर झाली. सचिन क्रिकेट टूरवरून परत येत होता तर अंजली तिच्या आईला घेण्यासाठी विमानतळावर आली होती. सचिनला पाहताच अंजली पहिल्याच नजरेत त्याच्या प्रेमात पडली होती. विशेष म्हणजे अंजलीला क्रिकेटची फारशी माहिती नव्हती. जेव्हा त्यांनी डेटिंग करायला सुरुवात केली तेव्हा अंजलीने क्रिकेटबद्दल अधिक माहिती गोळा करायला सुरुवात केली. 5 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 24 मे 1995 रोजी लग्न केले. दोघांच्या वयात सहा वर्षांचे अंतर आहे. अंजली सचिनपेक्षा 6 वर्षांनी मोठी असून दोघांना दोन मुले आहेत.
सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती :नारायण मूर्ती यांनी लग्नानंतर इन्फोसिसची स्थापना केली. पतीच्या या यशामागे सुधाचा मोठा हातभार आहे. त्यांचे नाते सांगते की त्यांच्या प्रेमात प्रामाणिकपणा आणि खरी बांधिलकी आहे. नारायण एक लाजाळू आणि अंतर्मुख स्वभावाचे व्यक्ती होते, तर सुधा पूर्णपणे विरुद्ध, बहिर्मुख आणि स्पष्टवक्ती होती. त्यावेळी सुधा या टेल्को (आताची टाटा मोटर्स), पुणे येथे काम करत होत्या. प्रसन्ना या मित्राच्या माध्यमातून तिची नारायणशी ओळख झाली. एके दिवशी नारायणने सुधाला जेवायला बोलावले. सुधा एकटीच होती म्हणून आधी तिने नकार दिला पण नंतर तिने होकार दिला. त्यानंतर दोघे घट्ट मित्र झाले. त्यानंतर मूर्तीने सुधाला ती एक तेजस्वी, सुंदर आणि हुशार मुलगी आहे असे म्हणत प्रपोज केले. सुधाने मात्र प्रतिसाद दिला नाही आणि ती तिच्या घरी गेली. तिने तिच्या पालकांना ही गोष्ट सांगितली. मात्र, मूर्तीच्या नोकरीमुळे त्याच्या आई-वडिलांना सुरुवातीला ते पटले नाही. अखेर आई-वडिलांनी होकार दिला आणि दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यांना रोहन नावाचा एक मुलगा आणि अक्षता ही मुलगी आहे.