लघवी करणे हे शरीरातले महत्त्वाचे कार्य आहे यासाठी शरीरातल्या वेगवेगळ्या भागांतून समन्वय साधला जातो. लहानपणी सगळेच जण दुसऱ्याच्या मांडीवर सू करतात. ( सध्या डायपरमुळे ही मजा निघून गेली आहे. ) पण जसे आपण मोठे होतो तसा मेंदू हे कार्य करण्यावर नियंत्रण ठेवायला लागतो. टाॅयलेट ट्रेनिंगमध्ये सामाजिक नियमांचा मोठा वाटा आहे.
दुसरे म्हणजे प्रौढ झाल्यानंतर दुसरे कुणी आपले लघवीचे कपडे साफ करत आहे, हे कुणालाच आवडणार नाही. पण अनेकदा मेंदूला दुखापत झाल्यानंतर लघवी होण्याची क्रिया, लघवीवर नियंत्रण असणे आणि ती बाहेर फेकणे यावर परिणाम होतो. यामुळे रुग्ण आणि त्याची काळजी घेणारा दोघांनाही खूप त्रासदायक होते. पुढे जाऊन याचे सामाजिक परिणामही उद्भवू शकतात.
ई टीव्ही सुखी भवच्या टीमने गोव्यातल्या मडगाव इथल्या रॉयल हॉस्पिटल रेनल सर्व्हिसेसचे संचालक डॉ. शैलेश कामत, एमएस, डीएनबी, युरोलॉजी, एमएनएएमएस, एफआयसीएस, वरिष्ठ मूत्रतज्ज्ञ आणि आंद्रोलॉजिस्ट यांच्याशी संवाद साधून याबद्दलची माहिती मिळवली.
आपला मेंदू लघवीवर कसे नियंत्रण ठेवतो ?
लघवीच्या चक्राचे २ टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे मूत्र संचय आणि दुसरा लघवी बाहेर फेकणे. मेंदूमध्ये दोन केंद्र आहेत. एक केंद्र मूत्राशय भरले जात असताना तुम्हाला निवांत ठेवते. दुसरे केंद्र लघवी होताना कार्यरत असते. काहीही त्रास न होता लघवी होण्यासाठी या दोन्ही केंद्रांचा एकमेकांशी ताळमेळ असावा लागतो.
स्ट्रोक्समुळे लघवी होताना अडचण येऊ शकते का ?
होय. एखाद्याला स्ट्रोक आला तर मूत्राशयात मूत्र संचय करणारे केंद्र बिघडते. याचा परिणाम मूत्राशय पूर्ण भरले आहे असे वाटत राहते. या स्थितीत मूत्राशय सक्रिय राहते. त्यामुळे रुग्णाला सारखे लघवीला लागते. शिवाय त्याला घाईही होते. कधी कधी हे इतके तीव्र असते की त्याला किंवा त्याला अंतवस्रातच लघवी होते.