महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

तुमचंही वजन वाढतंय? 'ही' आहेत कारणे - वजन वाढण्याची कारणे

अनेकजण लठ्ठपणामुळे त्रस्त असतात. मात्र, अशा लोकांचे खाण्यावर नियंत्रण नसते. आपण काही खाद्यपदार्थ खाणे टाळले, तर नक्कीच वजन कमी करण्यास मदत होते.

unintentional weight gain  how to gain weight  how to loss weight  reasons for weight gain  वजन वाढण्याची कारणे  वजन कमी करण्याचे उपाय
तुमचंही वजन वाढतंय? 'ही' आहेत कारणे

By

Published : Jul 14, 2020, 4:17 PM IST

हैदराबाद - लॉकडाऊनमुळे ताण-तणाव वाढला आहे. तसेच खाणं-पिणं देखील वाढलंय. त्यामुळे वजन वाढण्याच्या समस्या उद्भवल्या आहेत. काही असे खाद्यपदार्थ आहेत, जे खाल्ल्यामुळे वजनामध्ये वाढ होते. त्यामुळे असे खाद्यपदार्थ खाणे टाळावे.

'हे' खाद्यपदार्थ खाल्ल्याने वाढतेय वजन -

साखरयुक्त सोडा - साखरयुक्त सोड्यामध्ये कुठल्याही कॅलरीज नसतात. त्यामुळे शरीराला काहीही मिळत नाही. एका अभ्यासानुसार, साखरयुक्त सोड्याचे सेवन केल्यामुळे अचानकपणे वजन वाढल्याचे समोर आले आहे. तसेच यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयरोगाच्या समस्या देखील वाढतात.

पिझ्झा -आपण मोठ्या आनंदाने पिझ्झा खात असतो. मात्र, त्यामध्ये असलेले पदार्थ आरोग्यदायी नसतात. पिझ्झाचे काही प्रसिद्ध प्रकारांमध्ये रिफाईंड मैदा, चीज आणि प्रक्रिया केलेले मांस वापरलेले असते. त्यामुळे पिझ्झा खाल्ल्याने लठ्ठपणा आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. तसेच कँसर देखील होण्याची शक्यता असते. त्यामुळे असे खाद्यपदार्थ खाणे टाळले पाहिजे.

डोनट्स -डोनट्समध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज, साखर आणि रिफाईंड मैद्याचे प्रमाण जास्त असते. तसेच ते तळलेले असतात. त्यामुळे फॅटचे प्रमाण देखील जास्त असते. तसेच त्यामध्ये चॉकलेट क्रीम किंवा इतर गोड खाद्यपदार्थ टाकलेले असतात. त्यामुळे डोनट्स जास्त प्रमाणात खाणे टाळावे.

फ्रेंच फ्राईज - फ्रेंच फ्राईज हे कोणाला खायला आवडणार नाही? हा प्रत्येकाचा आवडता प्रकार असतो. मात्र, यामध्ये फॅट आणि मीठाचे प्रमाण जास्त असते. तसेच काहीजण केचअपसोबत खातात. त्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हे पदार्थ खाणे हे आरोग्यासाठी धोकादायक असते.

फळांचा रस - फळांच्या रसामध्ये पौष्टिक पदार्थ कमी आणि साखर जास्त प्रमाणात असते. त्यामुळे लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी तुम्ही साखरेचे प्रमाण कमी असलेल्या फळांचा रस पिऊ शकता.

गोड कॉफी -जर तुम्ही कॉफी पीत असाल, तर त्यामध्ये साखर टाकू नका. गोड कॉफी ही आरोग्यासाठी धोकादायक असते.

यासोबतच बंद पॉकेटमधले चीप्स, चॉकलेट्स आणि इतर प्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्यामुळे तुमचे वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे हे पदार्थ खाणे टाळायला पाहिजे.

ABOUT THE AUTHOR

...view details