ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Benefits Of Shilajit On Cardiovascular : हृदयरोगावर शिलाजीत आहे रामबाण उपाय, जाणून घ्या काय आहेत फायदे - तरुणांना हृदयरोगाचा धोका

हिमालयातील जंगलात शिलाजीत ही औषधी वनस्पती आढळून येते. शिलाजीत हृदयरोगाच्या रुग्णांसाठी वरदान ठरत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

Benefits Of Shilajit On Cardiovascular
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 31, 2023, 1:34 PM IST

नवी दिल्ली :बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांच्या आयुष्यावर विपरित परिणाम होत असल्याने तरुणांना हृदयरोगाचा धोका अधिक आहे. त्यामुळे हृदयरोगामुळे अनेक तरुणांचा दरवर्षी बळी जातो. मात्र हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी आधार देणाऱ्या अनेक महत्त्वाच्या औषधी आयुर्वेदात उपलब्ध आहेत. त्यातच हिमालय पर्वतरांगामध्ये नैसर्गिकरित्या शिलाजीत ही वनौषधी आढळते. शिलाजीत ही औषधी हजारो वर्षांपासून पारंपरिक आयुर्वेदिक औषधांमध्ये विविध आजारांवर उपचार करण्यासाठी वापरली जात आहे. शिलाजीतमध्ये अँटिऑक्सिडंट आणि विविध घटक समाविष्ट आहेत.

शिलाजीत सुधारते हृदयाचे आरोग्य : शिलाजीत हा हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी मुख्य आयुर्वेदिक घटकांपैकी एक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. शिलाजीत हा शरीराच्या सर्व भागांमध्ये योग्य रक्तप्रवाह राखण्यासाठी हृदयाला ऊर्जा प्रदान करते. आयुर्वेदिक डॉक्टर शिलाजीतला हृदयविकारांवर उपचार करण्यासाठी एक आवश्यक घटक म्हणून सूचवतात. शिलाजीतमध्ये आरोग्याला उत्तम ठेवणारे गुणधर्म आहेत. शिलाजीतमध्ये फुलविक अ‍ॅसिड, लोह आणि ग्लूटाथिओनसारखे अँटिऑक्सिडंट्स असल्याने शरीरातील ग्लूटाथिओनची पातळी वाढते. त्यामुळे हृदयविकारापासून बचाव करण्यात शिलाजीत महत्वाची भूमिका बजावते.

रक्तदाब करते कमी : उच्च रक्तदाब हा हृदयविकाराचा एक महत्त्वपूर्ण धोक्याचा घटक आहे. निरोगी जीवनासाठी सामान्य रक्तदाब अत्यावश्यक आहे. शिलाजीत रक्तदाबाची पातळी संतुलित राखते. त्यामुळे शिलाजीतचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आयुर्वेदिक घटक म्हणून वापर केला जाऊ शकतो. हिमालयातील खडकाचा हा तुकडा मानवांसाठी चमत्कारासारखा आहे. शिलाजीतमुळे शारीरिक पेशी दीर्घकाळ सामान्यपणे कार्य करू शकतात. शिलाजीत ब्लड प्रेशर, हृदयरोग आणि रक्तदाब समस्या असलेल्या नागरिकांसाठी देखील फायदेशीर आहे. शिलाजीत शरीराला निरोगी रक्तदाब नियमन आणि नियमित शारीरिक कार्यांसाठी आवश्यक असलेले खनिजे प्रदान करते. यातील प्रत्येक घटकामुळे रक्तदाबासाठी शिलाजीत औषध घेणे उपयुक्त ठरते.

कोलेस्टेरॉल करते कमी : शिलाजीतमुळे कोलेस्टेरॉलच्या पातळीत लक्षणीय सुधारणा सूचवली गेली आहे. याबाबत 2003 मध्ये संशोधन करण्यात आले, यात 16 ते 30 वर्षे वयोगटातील सुमारे तीस तरुणांना शिलाजीत देण्यात आले. या तरुणांना दोन गटांमध्ये विभागण्यात आले. यातील पहिल्या गटाने 45 दिवस दररोज 2 ग्रॅम शिलाजित घेतले. शिलाजीतचे सेवन न करणाऱ्यांच्या तुलनेत शिलाजीत गटामध्ये कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे.

हेही वाचा - National Stress Awareness Month 2023 : तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी साजरा करण्यात येतो राष्ट्रीय तणाव जागृती महिना

ABOUT THE AUTHOR

...view details